*सोशल मिडीया इन्फल्युएंसर व कार्यकर्त्यांनी मोबाईल शस्त्र समजुन मोदी* *सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहचवावी- कपिल मिश्रा*

लोकदर्शन यवतमाळ 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर / यवतमाळ – 21 व्या शतकात सोशल मिडीया हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोबाईल हे शस्त्र समजुन त्याचा वापर मोदीजींच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करावा. जे शस्त्र हाती घेतात ते सैनिक वा योध्दा असतात आपण सारे भाजपाचे योध्दा आहांत, नरेंद्र मोदीजींचे शुरवीर सैनिक आहात अर्थातच सोशल मिडीयाचे सुध्दा योध्दा आहात त्यामुळे प्रधानमंत्री मोदीजींच्या 9 वर्षातील राष्ट्रसमर्पित विकासाचा झंझावात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील घराघरापर्यंत पोहचविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आपणा सर्वांच्या खांद्यावर असल्याने योध्दयाला साजेल असे कार्य आपणास करावयाचे असल्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते कपिल मिश्रा यांनी सोशल मिडीया संयोजक, सहसंयोजक व मोठ्या संख्येत उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.
चंद्रपूर महानगरातील तुकूम स्थित महेश भवन येथे दि. 17 जून 2023 रोजी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मोदी@9 महाजनसंपर्क अभियान कार्यक्रमांतर्गत आयोजित ’सोशल मिडीया इन्फ्ल्यूएंसर मिट‘ ला ते संबोधीत करीत होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजक हंसराज अहीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमास सहसंयोजक प्रदेश भाजप सोशल मिडीया लक्की चावला, भाजपा ज्येष्ठनेते चंदनसिंह चंदेल, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, प्रदेश महिला सरचिटणीस अल्का आत्राम, चंद्रपूर महानगर अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, रमेश राजूरकर, लड्डू यादव, संध्या गुरनूले, ब्रिजभुषण पाझारे, माजी आ. सुदर्शन निमकर, अंजली घोटेकर, अनिल फुलझेले, राहुल पावडे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनूले, रघुवीर अहीर, नामदेव डाहुले, आशिष देवतळे, विशाल निंबाळकर, राकेश कोंडबतूनवर, अनिल डोंगरे , अभिजीत झाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या स्फुर्तीदायी भाषणात कपिल मिश्रा यांनी 70 वर्षांच्या राजवटीवर घणाघाती प्रहार केला. प्रधानमंत्री मोदींनी 9 वर्षात देशाचा इतिहास घडविला हे सांगतांना मोदींच्या वैश्विक किर्तीचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत वैश्विक स्तरावर त्यांना बाॅस संबोधून व नतमस्तक होत भारताप्रती श्रध्दा, समर्पण व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ते औरंगजेबाचा वारसा चालविणारे आहेत आम्ही राष्ट्रीय प्रेमाने ओतप्रोत सावरकरवादी आहोत. भारतीयांना 15 लाखांऐवजी मोदींनी रद्द केलेल्या 370, 35 A कलमाचे, रामललाच्या भव्य मंदीराचे, सर्जीकल स्ट्राईकचे अधिक महत्व आहे. या देशाची मोदीपूर्व राजवटीत काय अवस्था होती हे सारा देश जाणतो. या देशात 9 वर्षांपूर्वी आतंकी घटना, बाॅम्बस्फोट, असुरक्षीतता होती आज देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करित आहे. व्यवस्था तिच आहे. केवळ नेतृत्व मोदीजींच्या हातात असल्याने या देशाकडे करड्या नजरेने बघण्याची कुणाची बिशाद नाही असेही मिश्रा म्हणाले.
ते म्हणाले मोदीजींनी देशाच स्वाभिमान, धर्म, संस्कृती व सभ्यता वृध्दींगत केली आहे. कोरोना काळातील त्यांच्या कार्याची वैश्विक स्तरावर दखल घेतल्या गेली आहे. रस्ते, रेल्वे , एअरपोर्ट व इन्फ्रास्ट्रक्चर च्या बाबतीत देश फार पुढे गेला आहे. 46 करोड लोकांना 9 वर्षात गरिबी रेषेच्या बाहेर काढण्यात मोदी यशस्वी ठरले आहेत. शेकडो योजनांनी लोकांचे जीवन समृध्द केले आहे. सरकारचे हे यश जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
*मोदीजींचे कार्य सोशल मिडीया कार्यकत्र्यांनी घरोघरी पोहचवावे – हंसराज अहीर*
आपल्या उद्घाटकीय भाषणात हंसराज अहीर यांनी सोशल मिडीयाचे महत्व विशद करीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी यात तज्ज्ञ बनावे असे आवाहन केले. या देशात लोकशाही असल्याने प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचा संबंध राजकारणाशी आहे. देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे आपण सदस्य आहात ही सन्मान व गौरवाची बाब आहे. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून सर्वांना मोदींजीच्या राष्ट्रसमर्पित विकास कार्याला जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करायची असल्याने सोशल मिडीया इंन्फल्यूएसंरनी हे कार्य स्वताला झोकुन देत करावे.
प्रधानमंत्री नरेेंद्र मोदींनी या देशात आतंक, घुसखोरीवर नियंत्रण मिळवित देशाच्या सर्वाग विकासात अभूतपूर्व कार्य केले आहे. सिमा सुरंक्षीत आहे. काल पर्यंत नाॅर्थ-ईस्ट, काश्मिर पेटत होता प्रधानमंत्र्यांनी या ठिकांणी शांतता प्रस्थापित करीत लोकशाहीची बिजे रोवली. अनेक ज्वलंत प्रश्न दूरदृष्टी ठेवुन सोडवीले 75 वर्ष राज केलेल्यांनी जे केले नाही ते मोदींजीनी 9 वर्षात करुन दाखविले यावेळी अहीर यांनी बांग्लादेश-भारत सिमा व अनेक बाबींवर मोदींनी घेतलेल्या निर्णयाचा परामर्ष घेतला प.बंगाल व अन्य राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत सुरु असलेल्या गंभीर बाबींवरसुध्दा त्यांनी भाष्य केले सोशल मिडीयाच्या माध्यमातून केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवरील पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे कार्य, विकास लोकसभा क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्वतःला झोकुन द्यावे असे आवाहन केले.
या प्रसंगी देवराव भोंगळे, लक्की चावला, डाॅ. गुलवाडे यांनी सोशल मिडीयाचे महत्व, मिडीया इंन्फल्युएंसरची जबाबदारी, मोदी राजवटीतील लोकाभिमुख विकास कामे आदी बाबींवर समर्पक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन सौ. अंजली घोटेकर यांनी केले या सोशल मिडीया इंन्फल्युएंसर मिटला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सोशल मिडीया संयोजक, सहसंयोजक, भाजपा व विविध आघाड्यांचे पदाधिकारी, भाजपस्नेही नागरिक व बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *