पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत निलेश ताजणे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने मित्रपरिवार व्दारा विविध सेवा उपक्रमाचे आयोजन.

लोकदर्शन गडचांदुर):- शिवाजी सेलोकर

सामाजिक तथा धार्मिक क्षेत्रामध्ये जनसेवेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणारे भाजपा जेष्ठ नेता निलेश ताजणे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पुर्व गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले.
उपरवाही येथे भव्य रोगनिदान शिबीर,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा आरोग्य क्षेत्रात कार्यरत आशा वर्कर्स,समाजसेवक बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कवठाडा येथे प्रगतशील शेतकरी,गुणवंत विद्यार्थी,नवनियुक्त शासकीय सेवेत रुजू तरूणांचा सत्कार.

नांदा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.यावेळी ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

बिबी या स्थानावर बचत गटांना उपयोगी साहित्य वितरण,समाजकार्य करणाऱ्या दोन मातृशक्तींचा सन्मान,रूगणसेवेच्या माध्यमातून जनसेवा करणारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ गिरीधर काळे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी निलेश ताजणे यांनी समाजकारण अंगिकारले आहे,ही स्तुत्याची बाब असुन आपल्या भागाचे उभरते नेतृत्व आहे,त्यांचा जनसंपर्क मजबुत आहे,अशी प्रतिक्रिया हंसराज अहिर यांनी दिली.
कार्यक्रमाला माजी आमदार ॲड संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,राजु घरोटे,जेष्ठ भाजपा नेता शिवाजी सेलोकर,महादेव एकरे, हितेश चव्हाण, युवा उद्योजक संतोष मोतेवाड, नगरसेवक रामसेवक मोरे, राजेंद्र लोनगाडगे,गडचांदुर भाजपा शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार, विजयालक्ष्मी डोहे,रूपाली बोबडे सरपंच कवठाडा,रोगे उपसरपंच कवठाडा,गीताताई सिडाम सरपंच उपरवाही, गजानन बुरान,अशोक तलांडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपरवाही,रामकिसन मुसळे,कौरासे उपसरपंच उपरवाही,युगंधर पानघाटे,सुभाष बुऱ्हाण,सविता खनके,रामदास कोहळे,संजय चौधरी,आकाश भाऊ, रविकुमार बंडीवार,अशोक झाडे,देविदास थिपे,शंकर उरकुडे,रामकिसन मुसळे, मनोहर कुळसंगे,विशाल अहिरकर,सलमा पठाण,नुतेश बेरड,यशवंत धांडे,विशाल अहिरकर, विठ्ठल अहिरकर, शंकर पेगडपल्लिवार,अजिम बेग यांचे समवेत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *