अनुगामी लोकराज्य महाअभियान समन्वयक सतीश मुसळे सन्मानित 

by : Mohan Bharti

कोरपना : अखंड भारताचे प्रेरणास्रोत,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक व हिंदु साम्राज्य दिनाच्या औचित्याने राजुरा येथे झालेल्या कार्यक्रमात अनुगामी लोकराज्य महाअभियान राजुरा भाग समन्वयक सतिश मुसळे यांना गौरविण्यात आले.
जिवती,कोरपणा,राजुरा,गोंडपिपरी तालुक्यात केंद्र सरकार तथा राज्य सरकारच्या कल्याणकारी उपक्रमांची माहिती जनसामान्या पर्यंत पोहोचविणेसाठी अविरत प्रयत्न सतिश मुसळे करीत असतात.
प्रशासनातील बारकावे अधोरेखीत करूण ते मुख्यमंत्री कक्षापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात.
पुर्व गृहराज्यमंत्री ओबिसी महामंडळ अध्यक्ष श्री.हंसराज जी अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत सतिश मुसळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर अपस्थित होते.
यावेळी यादवराव धोटे महाविद्यालय अध्यक्ष सुधिर धोटे,लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे,स्वागताध्यक्ष अविनाश जाधव,युवा उद्योजक निलेश ताजणे, व्यावसायिक राधेश्याम अडाणिया, शिवाजी शेलोकर,डॉ.अर्पित धोटे,गणेश रेकलवार,प्रगतिशील शेतकरी सुरेश रागीट,प्रशांत घरोटे,जेष्ठ नेते केशव गिरमाजी,सुरेश केंद्रे,महेश देवकते,राजुभाऊ घरोटे,दिलीप ताजणे उपस्थित होते.
नाविण्यपुर्णते शेती करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान,शेतकरी व शेतमजुर गरजवंत महिलांना भाजीपाला लागवडीचे बियाणे टिफीन व साडी वितरण,अल्पभुदारक शेतकरी बांधवांना बियाणे वितरण, सामाजिक कार्य करणाऱ्या बांधवांचा सन्मान,शासनाच्या विविध पदावर नियुक्त झालेल्या तरूण-तरूणींचा सत्कार,वर्ग १२ वी मध्ये नाविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्यांचा सन्मान,अनुगामी लोकराज्य महाअभियान संवादिनींचा सत्कार,बारा बलुतेदारांच्या प्रमुख नेतृत्वाचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कोरपणा,जिवती,राजुरा,कोरपणा तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर,विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते,युवा नेतृत्व, प्रयोगशील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवराज्यभिषेक सोहळा समिती व्दारा सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश जाधव यांनी केले.संचलन बादल बेले व डॉ.दुर्योधन यांनी केले,आभार प्रदर्शन प्रा.इर्शाद शेख यांनी मानले.
कार्यक्रमाला परिसरातील प्रगतिशील शेतकरी,शेतमजुर,युवा संगठन प्रमुख व मातृशक्ति मोठ्या संख्येने उपस्थित होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *