आटपाडी पंचायत समिती म्हणते आटपाडी नगर पंचायत ने पैसे भरले नाहीत आम्ही बोरवेल दुरुस्त करणार नाही आटपाडी बौद्ध समाज नगरपंचायत वर काढणार मोर्चा, हे धरणे धरणार ♦️आटपाडी नगरपंचायत चे जाणून बुजून दुर्लक्ष, दलित वस्ती सुधार योजना नुस्तीस नावाला, येथे जनतेला प्यायला नाही पाणी विलास खरात

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

हातपंप नादुरुस्त असलेमुळे पाण्यासाठी हाल सुरु असलेमुळे मोर्चाने येऊन धरणे आंदोलन करणार आटपाडी मधील बौद्ध समाज व शासनाला जाब विचारणार,
ऐन उन्हाळ्यात हातपंप बंद असून शासन स्तरावर टोलवा टोलवी चालू असून
या विरोधात मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे विलास खरात यांनी कळविले आहे व सर्व समाज बांधवांचे निवेदन पाठविले आहे

आटपाडी येथील डॉ. आंबेडकर नगर मधील गेले अनेक महिन्यापासून हातपंप नादुरुस्त असलेमुळे पाण्यासाठी लोकांचे अत्यंत हाल सुरु आहेत. त्याबाबत आपणास अनेक वेळा हातपंप दुरुस्ती बाबत विनंती केलेली आहे, परंतु आपण जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहे. तसेच सदर वस्तीमध्ये जल शुद्धीकरण यंत्र बसविलेले आहे, त्याच्या मशनरी सुद्धा खराब झालेमुळे ते नादुरुस्त आहे. तसेच पिण्याच्या पाणी सुद्धा वेळेवर येत नाही, त्यामुळे सदर वस्तीतील लोकांची पाण्याची अत्यंत गैरसोय होत आहे. पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत आहे.

तसेच मा. उप अभियंता सो, छोटे पाटबंधारे उप विभाग, पंचायत समिती आटपाडी यांचेकडे हातपंप दुरुस्ती बाबत विनंती केली असता त्यांचे म्हणणे आहे की, आटपाडी नगर पंचायतीने पैसे भरले नसलेमुळे आम्ही हातपंप दुरुस्त करू शकत नाही, त्यामुळे पाण्यासाठी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जनतेची गैरसोय करतात हे दिसून येत आहे..

सदर हातपंपास भरपूर पाणी आहे, परंतु सदरचा हातपंप हा मागासवर्गीय वस्तीत असलेमुळे जातीय भावनेतून गरीब मजूर लोकांची पाण्यासाठी मुद्दाम कुचंबना करणेत येत आहे. सदर मागासवर्गीय वस्ती ही कामगार समुहाची असलेमुळे शक्यतो त्यांच्याकडे पाणी साठविणेची व्यवस्था नाही. नगर पंचायतीच्या पाणी विभागाकडून पाणी आले नाही तर सदर वस्तीचे पाण्यासाठी अत्यंत हाल सुरु आहेत.

 

तेव्हा आपणास नम्रपणे विनंती करणेत येते की, आटपाडी येथील डॉ. आंबेडकर नगर आपल्या कार्यालयावर समस्त बौध्द समाज व मागासवर्गीय लोकांच्या मधील हातपंप सत्वर दुरुस्त करून मिळावा, कारण उन्हाळ्याच्या दिवसात सध्या पाण्यासाठी लोकांचे अत्यंत हाल सुरु आहेत. तरी आपण हातपंप सत्वर दुरुस्त करून देणेत यावा किंवा नवीन बसवून द्यावा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *