कोरपना बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा .

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

कोरपना – कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना ची पाचवी सार्वत्रिक निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीचा निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कृत शेतकरी सहकार आघाडीनी सर्वाधिक १३ जागा जिंकत बाजार समितीवर घवघवीत विजय संपादन केला.
या निवडणुकीत काँग्रेस, शेतकरी संघटना – गोंडवाना युती , भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. यात काँग्रेस नी १३ , शेतकरी संघटना गोंडवाना युतीनी पाच जागा संपादन केल्या. तर भाजपाला एकाही जागेवर खाते उघडता आले नाही. यात सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून अशोक बावणे , ज्ञानेश्वर आवारी , गणेश गोडे ( काँग्रेस ) ,सुनील बावणे, दत्तात्रय कांबळे , निशिकांत सोनकांबळे ( शेतकरी संघटना गोंडवाना युती) , ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून विनोद नवले इरफान शेख ( काँग्रेस ) , अनुसूचित जमाती गटातून विकास दिवे ( शेतकरी संघटना गोंडवाना युती ), ग्रामपंचायत दुर्बल घटक गटातून उत्तम कराडे ( काँग्रेस ), महिला गटातून विठाबाई देवालकर, वंदना बल्की ( काँग्रेस ) , हमाल मापारी गटातून एजाज दादन शेख ( काँग्रेस ), सेवा सहकारी संस्था विजा गटातून राजीव ढवळे ( शेतकरी संघटना गोंडवाना युती ), सेवा सहकारी ओबीसी गटातून पुंडलिक गिरसावळे( काँग्रेस ) , अडते व्यापारी गटातून बाळू बोडखे, इरफान शेख (काँग्रेस) यांनी विजयी प्राप्त केला. ही निवडणूक काँग्रेस नी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या नेतृत्त्वाखाली लढली होती. विजयानंतर कोरपना शहरात भव्य विजय मिरवणूक रॅली काढण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीधरराव गोडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम रणदिवे ,
सुरेश मालेकर, भाऊराव बोरडे सिताराम कोडापे, माजी पंचायत समिती उपसभापती संभाजी कोवे , नितीन बावणे, उमेश राजूरकर , शैलेश लोखंडे , इस्माईल शेख ,
निसार शेख आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *