सेवक कामगार संघटनेकडून, मिरज क्षेत्रातील पोलीस आधिकारी व कर्मचारी यांना मिठाई वाटुन कामगार दिन साजरा*

 

लोकदर्शन मिरज ;👉राहुल खरात

सेवक कामगार संघटनेकडून १ मे कामगार दिनानिमित्त मिरज शहर, ग्रामीण तसेच महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष काम करणारे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मिठाई वाटुन कामगार दिन साजरा करण्यात आला त्या वेळेस महात्मा गांधीचे पोलीस निरीक्षक मा. भालेराव साहेब आणि तिन्ही ठाणे मधील अनेक पोलीस अधिकार व कर्मचारी उपस्थित होते तेव्हा बोलताना संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष मा. उमरफारुक ककमरी म्हणाले कि पोलीस विभाग २४×७ सेवा करत असतो,आपण नेहमीच कोणताही सणवार असोत किंवा मिरवणुका,मंत्री महोदयांचे दौरे,धार्मिक उत्सव,महापुर,आंदोलने,जागतिक महामारी अश्या अनेक वेळेस आपण बंदोबस्तात सतत व्यस्त असतात.आपण २४×७ सतर्क आहात म्हणुन आम्ही सर्वसामान्य नागरिक आपल्यावर विश्वास ठेवून बिनधास्त राहतो. पण अनेकदा राजकिय पक्षांकडून लोकांची दिशाभूल करणारी राजकिय खेळी मुळे सुध्दा बंदोबस्ताचा ताण आपल्यावर पडत असतो.निवडणूकीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत आपण बंदोबस्तातच राहता, या सर्वच कारणास्तव आपण स्वतःच्या परिवारात कडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही.अनेकदा कुटुंबात आनंदी क्षणात असाल व काही आकस्मित दुर्घटना झाली कि परिवारासोबतचे आनंदी क्षण सोडुन पुन्हा बंदोबस्त,आमच्या सारख्या अनेक संघटनेचे आंदोलन झाल कि पुन्हा बंदोबस्त, आपल्या ह्या संपूर्ण सक्रिय विभागामुळेच शहर, तालुका,जिल्हा,आणि पुर्ण महाराष्ट्र निवांत जिवन जगत आहेत. परंतु *पोलीस सुध्दा माणुसच…* असे आम्हास प्रत्येक व्यक्तीस सुचवायचे आहे, पोलीस प्रशासन म्हटले कि लोकांमध्ये चुकिची भावना निर्माण होते आणि हे होऊ नये, आपण आहो – रात्र धडपड करुन लोकांना सुरक्षित करुन कायदा सुव्यवस्था राखता. १मे कामगार दिवसशी सुध्दा कामावर कार्यरत आहात त्या मुळे तुमच्या ह्या कामाला आमच्या सेवक कामगार संघटनेकडून सलाम. त्या वेळेस सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे,शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम,अनिस मोमीन,सचिन वाघमारे,सचिन कांबळे,प्रथमेश बनसोड आदि उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *