



by : Shankar Tadas
नमस्ते चांदा फाउंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह तेलंगणा राज्यातून उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णालयात उपचार करण्यासाठी २० रुपये नोंदणी शुक्ल आकारण्यात येते. परंतु, या परिसरात वाहन उभे करायला देखील २० रुपये आकारण्यात येते. चारचाकी वाहनाला २० रुपये तर दुचाकीला १० रुपये आकारण्यात येते. त्यामुळे येथे उपचारांपेक्षा वाहनतळ शुल्क जास्त असे चित्र दिसून येत आहे. हि बाब अतिशय गंभीर असून तात्काळ येथील वाहनतळ शुल्क आकारणी बंद करण्याची लोकहितकारी मागणी नमस्ते चांदा फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आले.
विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात येते. तेव्हा दुःखाच्या डोंगरात असलेल्या नातेवाईकांकडून देखील हे शुल्क आकारण्यात येते. हि बाब अतिशय गंभीर आहे. या रुग्णालयामध्ये उपचार घेणारे रुग्ण हे गरीब असतात. त्यांना डबा पोहोचवून देणे किंवा इतर मदतीसाठी येणारे नातेवाईक वाहन घेऊन येत असेल, तर त्यांना देखील भूदंड बसू लागला आहे.
#medicalcollechandrapur