सेवक संघटित व असंघटित आरोग्य,कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य. सांगली जिल्हा संपर्क कार्यालय उदघाटन कार्यक्रम संपन्न.*

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सेवकास आपले हक्काचे व आपल्या अडचणी मांडण्यासाठी स्वतःचे घर म्हणजेच संपर्क कार्यालय अंत्यत आवश्यक होते म्हणून संपर्क कार्यालयात आपल्या हक्काचा माणूस हवा आपण आपले सुख-दुःख एकमेकांना वाटून येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संपर्क कार्यालय अत्यंत गरजेचे होते म्हणून सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम नेतृत्वाखालील सांगली शहर जिल्हाउपाध्यक्ष सचिन कांबळे यांनी आरोग्य क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन आरोग्य सेवकांच्या समस्यांवर काम करणे सोईचे होण्याकरिता संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे अशी माहीती सांगली जिल्हाध्यक्ष अनिल मोरे यांनी दिली. जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष मा.उमरफारुक ककमरी यांच्याकडून करण्यात आले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून सेवक बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष मा. संजय कांबळे उपस्थित होते तसेच सांगली जिल्हा व विविध तालुका पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आले नवनियुक्त पदाधिकारी व पदनाम पुढील प्रमाणे
मा.शिवाजी गुळवे – सांगली जिल्हा उपाध्यक्ष
मा.दिपालीताई वाघमारे – बांधकाम जिल्हा महासचिव
मा.सुरेश भोसले – मिरज तालुका संघटक,
मा.सचिन साळुंखे – तासगाव तालुकाध्यक्ष,
मा.अनिकेत कांबळे – मिरज तालुका उपाध्यक्ष,
मा.शुभम उपाध्ये – मिरज तालुका उपाध्यक्ष
निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देत संघटनेची ध्येय व दिशा,प्रामाणिकपणा,संघटना बांधणी,नविन सदस्य जोडणी इ…विषयी संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष मा. उमरफारुक ककमरी यांनी मार्गदर्शन केले आणि येणाऱ्या काळात संघटनात्मक बांधणीसंदर्भात आराखडा तयार करण्यात आले त्या वेळी संस्थापक सचिव फिरोज मोमीन, सेवक बांधकाम जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, कवठेमहंकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे,मिरज तालुकाध्यक्ष छायाताई मोरे, गजानन जाधव इत्यादी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *