डॉक्टर बापट यांच्या जयंती निमित्त निशुल्क वात रोग शिबिर.

 

लोकदर्शन 👉 अशोक गिरी

आंधळगांव:- समाज‌ कल्याणसाठी संपूर्ण आयुष्य निस्वार्थपणे तन-मन-धनाने वाहणारे प्रसिद्ध ज्येष्ठ सामाजिक सेवक व कर्मयोगी डॉ.बापट यांच्या जयंतीनिमित्त सप्तऋषी सेवा ट्रस्ट द्वारा संचालित कर्मयोगी डॉ.बापट स्मृती दवाखाना आंधळगाव च्या वतीने निशुल्क वात्त रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.सेवा ही धर्म है व रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा यांचे बोध वाक्यावर निरंतरपणे समाजसेवेत अग्रेसर सप्तऋषीय सेवा ट्रस्ट नागपूरचे संस्थापक डॉ. हेमंत सुरेश राहांगडाले आयुर्वेद वाचस्पती(MD)यांच्या मार्गदर्शनात जेष्ठ समाजसेवक कर्मयोगी डॉ.प्रभाकर बापट यांच्या समाजकार्याने प्रेरित होऊन त्यांच्या कर्मस्थानी आंधळगाव येथे सार्वजनिक ‘कर्मयोगी डॉ.बापट स्मृती दवाखाना’चे उद्घाटन करण्यात आले.या रुग्णालयात गरीब व गरज रुग्णांना अति अल्प दरात उत्तम ऍलोपॅथिक,आयुर्वेदिक व प्राकृतिक चिकित्सा सेवा प्रदान केले जाते.ज्येष्ठ समाजसेवक व कर्मयोगी डॉ. प्रभाकर बापट यांच्या जयंतीचे औचित्य साधुन‌‌ सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते.कर्मयोगी डॉ.बापट यांनी आपल्या जीवनात निशुल्क रुग्ण सेवा दलित व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजासाठी कोसा उद्योगाची निर्मिती केली व अनेक सामाजिक कार्यातून समाजाला नवचैतन्य व प्रेरणा दिली त्यांच्या सामाजिक कार्याची व विचाराची छाप आजही त्यांच्या कर्मस्थानी पहावयास मिळते. म्हणूनच अशा ज्येष्ठ समाजसेवक व कर्मट‌ समाज सुधारकांच्या जयंतीनिमित्त निशुल्क वातरोग शिबिराचे आयोजन कर्मयोगी डॉक्टर बापट स्मृती दवाखान्याकडून करण्यात आले होते.यात सर्वप्रथम सर्वोदय समितीचे संयोजक डॉ.विकास खराबे यांच्या यांच्या हस्ते कर्मयोगी डॉ.प्रभाकर बापट यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर डॉ.शिवशंकर दृगकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या शिबिरात असंख्य रुग्णांनी तज्ञ चिकित्सांकाकडून तपासणी, औषध आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला.या शिबिरात वात रोग तज्ञ आयुर्वेदिक डॉ. हेमंत राहांगडाले, प्राकृतिक चिकित्सक डॉ. हरेंद्र राहांगडाले,सहाय्यक चिकित्सक डॉ.मोहर तेलंग,योग चिकित्सक डॉ. शिवशंकर दृगकर, सहाय्यक चिकित्सक डॉ.विकास खराबे,सहाय्यक चिकित्सक डॉ. प्रणय चव्हाण ,आरोग्य सेविका वैष्णवी बुरडे,आरोग्य सेविका योगिता लाकडे आरोग्य सेविका नेहा कुंभारे, आरोग्य सेवक जगदीश कराडे आदिनी सेवा प्रदान केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *