घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या समर्थकांची गळती सुरु शहराध्यक्षाच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या अनेकांचा काँग्रेसला रामराम

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या समर्थकांची गळती सुरु झाली आहे.
घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वावर नाराज होऊन अनेकांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला त्यामुळे घुग्घुस शहरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
काही महिन्याच्या कालावधीत कोटेक्ना कंपनीच्या कामगारांनी, गुप्ता वाशरीच्या हायवा-ट्रक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व गांधीनगरच्या शेख कुटुंबियांनी घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वावर नाराज होऊन भाजपात प्रवेश केला.
यापूर्वी अनेक युवकांनी, महिलांनी व पुरुषांनी घुग्घुस काँग्रेस कमेटीचे माजी शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रस्ताव देऊनसुद्धा त्यांनी घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाला झूगारून घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या माजी शहराध्यक्षाच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
त्यामुळे घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला आता उतरती कळा लागली आहे.
घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाने भुस्खलनग्रस्तांचा विषय हाती घेतला होता यात ते तोंडघशी पडले नंतर त्यांनी वेकोलि वसाहतीचा विषय हाती घेतला यातही त्यांची नाचक्की झाली.
मागील अडीच वर्षे काँग्रेसची सत्ता राज्यात होती परंतु त्यांनी विकासाचे कामे केली नाही त्यामुळे अनेकांचे भाजपाकडे आकर्षण वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here