महाराष्ट्र कामगार सेनेच्या २ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी अधिवेशन.*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २७/१०/२०२२ :-* शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा राज्यव्यापी अधिवेशन दि. ०२/११/२०२२ बुधवार रोजी आयोजित करण्यात आल्या असल्याचे माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
या राज्यव्यापी महाअधिवेशनात केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदा करून कामगारांना देशोधडीला लावला आहे. दिवसेंदिवस कामगार हे नावाच पुसून टाकण्याचे प्रयत्न केंद्रातील भाजपारूपी मोदी सरकारने केले आहे. याबाबत आवाज उठवून जनजागृती करणे हे या अधिवेशनाचे मुख्य विषय राहिल. त्याचबरोबर विडी, यंत्रमाग व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्याबाबत राज्यस्तरीय ठराव पारीत करण्यात येणार आहे. तीन सत्रात होणाऱ्या या अधिवेशनात महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
सदर अधिवेशनात सकाळी १० ते ११ या पहिला सत्रात श्रीनिवास चिलवेरी, ॲड. मुनिनाथ कारमपुरी हे उद्घाटन व कामगार समस्या याविषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात सरकारचे लक्ष कामगारांकडे कधी जाणार. सकाळी ११ ते १२ वक्ते प्रा. श्रीशैल वाघमोडे, लक्ष्मीबाई इप्पा हे राहणार आहेत. समारोपीय तिसऱ्या सत्रात आता आम्ही कामगारांसाठी या विषयावर कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) हे मार्गदर्शन करणार आहेत. अशा प्रकारे महाअधिवेशाचे रुपरेषा असणार आहे.
*सोबत :- कार्यक्रमपत्रिका जोडलेली आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here