मुख्याध्यापिका मंजुषा पंकज मत्ते (लालसरे) आचार्य पदवीने सन्मानित

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

आदर्श हिंदी विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका मंजुषा पंकज मत्ते
(लालसरे) यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र शाखेअंतर्गत इतिहास विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. ‘श्रीमती जानकीबाई परशुराम आपटे यांच्या ऐतिहासिक कार्याचे चिकित्सक अध्ययन’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. मंजुषा यांनी प्रा. डॉ. प्रकाश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध पूर्ण केला.
त्यांच्या संशोधनासाठी बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळाचे सचिव सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब मोहितकर, माजी अध्यक्ष शंकर के. मंडलिया, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक भाऊसाहेब जिवतोडे, डॉ. संगीता मेश्राम, डॉ. श्याम कोरेटी, डॉ. रवी खंगई, अहमदनगर येथील जानकीबाई आपटे यांचा मुलगा भालचंद्र आपटे, सून कमलताई आपटे, ग्रंथपाल डॉ. संतोष यादव, पत्रकार भूषण देशमुख,
पंकज मत्ते, वामनराव मत्ते, भारती मत्ते, संभाजी लालसरे, नंदाताई लालसरे, प्रा आरजू आगलावे, सतीश राजूरकर, ज्योत्स्ना राजूरकर, सुरेश राजूरकर, सुलभा राजूरकर, गजानन लालसरे, मनीष जैन, सपना जैन, सर्व आप्तेष्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here