आसोलामेंढा प्रकल्पाअंतर्गत वनप्रस्तावाबाबत ना सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली बैठक* *तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

आसोलामेंढा प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्र व कालवा वितरण प्रणालीस आवश्यक 315.74 हे वनजमिनीच्या प्रस्तावाबाबत तातडीने कार्यवाही करुन 10 ऑक्टोबर पूर्वी मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपुर यांना प्रकल्पाची सद्यस्थिती बाबत पाहणी करुन 10 ऑक्टोबरपुर्वी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

आसोलामेंढा प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्र व कालवा वितरण प्रणालीस आवश्यक 315.74 हे वनजमिनीच्या प्रस्तावाबाबत ना. सुधीर मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य मस्त्यव्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महाराष्ट्र वनविकास महामंडळ अंबाझरी नागपूर येथे आढावा बैठक पार पडली.

आसोलामेंढा प्रकल्पाची उंची 2.70 मी. ने वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर असुन त्यान्वये धरणाचा साठा 67 दलघमी वरुन 120 दलघमी होणर आहे; त्याद्वारे 9919 हे. सिंचन क्षमतेवरुन 54879 हे. सिंचन क्षमता निर्मित होणार आहे. त्याप्रमाणे बुडित क्षेत्र व कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकुण 315.74 हे. वनजमीनीची आवश्यकता आहे.त्याअनुषंगाने गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता, श्री. आ. तू. देवगडे यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत कळविले व त्याअनुषंगाने गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता, श्री. आ. तू. देवगडे यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत कळविले व सदर वनप्रस्ताव विभागीय वन अधिकारी वनविभाग चंद्रपुर यांचे पत्र क्र.953 दि.23.09.2022 अन्वये चार प्रतित मा. मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपुर यांना सादर करण्यात आल्याचे साग़ितले आहे.

या अनुषंगाने ना सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपुर यांनी समन्वयक अधिकारी नागपुर यांच्याकडे पाठविण्यात यावे अश्या सूचना दिल्या.

समन्वयक अधिकारी नागपुर यांनी प्रस्तावाची आवश्यक तपासणी करुन प्रस्ताव दि. 25 ऑक्टोबर पर्यंत मंत्रालय मुंबई येथे सादर करावे असे निर्देश दिले. मंत्रालयातून सदर प्रस्तावाची चाचणी करुन प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येईल.

केंद्र शासनामार्फ़त प्रस्तावाची तपासणी करुन नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये प्रस्तावित बैठकित मांडण्याचे निर्देश श्री झुरमुरे (समन्वयक अधिकारी) अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, तथा केंद्रस्त अधिकारी म.रा. वनविभाग नागपुर व मा. मुख्य अभियंता गोसीखुर्द प्रकल्प ज. वि. नागपुर यांना निर्देश दिले.

या बैठकीस श्री. झुरमुरे, समन्वयक अधिकारी , अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, तथा केंद्रस्त अधिकारी म.रा. वनविभाग नागपुर,
आ. तू. देवगडे मुख्य अभियंता गोसीखुर्द प्रकल्प जलसंपदा विभाग नागपुर,, ए. के. देसाई, मा. अधिक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर,जे. बी. तुरखेडे, कार्यकारी अभियंता, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग हे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *