नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ बोरी उरण च्या माध्यमातून अन्नदान.

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 2 ऑक्टोंबर 1975 साली स्थापन झालेले उरण तालुक्यातील बोरी येथील नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळाचे यंदाचे 48 वे वर्ष असून या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्रौत्सवात विविध सामाजिक शैक्षणिक , सांस्कृतिक, कला क्रिडा आदी विविध उपक्रम राबवित असतात. यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची निगा राखत बोरी येथे होणेश्वर मंदिरासमोर आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीरात इसीपी, ब्लड ग्रुप, डायबेटीस, बीपी, कान नाक डोळे, पोटाचे आजार, लहान मुलांचे आजार आदींची तपासणी करण्यात आली . डी.वाय पाटील हॅस्पीटल ब्लड बँक नेरूळ यांच्या सहकार्याने होणेश्वर मंदिरा समोर बोरी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून अनेक रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.यावेळी करिअर मार्गदर्शन, नृत्य संध्या, हळदी कुंकू, पाक कला स्पर्धा,स्वछता अभियान,वेष भुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अन्नदान आदी विविध उपक्रमही राबविण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, कवी मनोज उपाध्ये, खेळाडू ध्रुवित म्हात्रे, उद्योजक नरसु पाटिल यांचा विशेष सत्कार तर कु. आर्यन मोडखरकर, कु. चिराग म्हात्रे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

स्वागताध्यक्ष गणेश शिंदे, अध्यक्ष अतुल ठाकूर, कार्याध्यक्ष सुदेश साळुंके, उपाध्यक्ष विशाल चौकेकर सचिव-दिपेश म्हात्रे, खजिनदार – कुणाल पवार, सहसचिव दिलीप साळुंखे,सहसचिव वसंत कुळये, सहखजिनदार नंदकुमार पाटील, सहखजिनदार – रविद्र म्हात्रे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विविध उपक्रमास जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *