फ्रेण्डस सर्कल सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा पर्यावरणपूरक नवरात्रौत्सव

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 4 ऑक्टोंबर नवरात्रौत्सवात पर्यावरणाविषयक जनजागृती व्हावे, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे यासाठी उरण शहरातील कोटनाका येथील फ्रेंड्स सर्कल सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळातर्फे यंदा पर्यावरण पुरक अशी देवीची मूर्ती बसवून या मंडळाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नवरात्रौत्सव साजरा केला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा केमिकलयुक्त रंगाचा वापर करून देवीच्या मूर्ती करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक आहे. त्याऐवजी शाडूच्या मातीपासून किंवा कागदाच्या लगद्यापासून बनविलेली मूर्ती हे पर्यावरण पूरक, निसगाचे संवर्धन करणारे आहे हीच बाब लक्षात घेउन जेजे आर्ट मधील विद्यार्थी तथा मुंबई धारावी येथील प्रेम कदम यांनी मूर्ती बनवली. कागद डिंक, शाई या वस्तूंचा वापर करून अतिशय सुंदर व सुबक अशी देवीची मूर्ती प्रेम कदम यांनी बनविली.विशेष म्हणजे सदर देवीची मूर्ती हलकी असून दोन माणसे ती सहज उचलू शकतील एवढे वजनानी हलके आहे.मकराची सजावट- उमेश पांचाळ यांनी उत्तम पद्धतीने केली आहे. नवरात्रौत्सवात विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रम येथे राबविण्यात आले.जनतेने, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाने जास्तीत जास्त पर्यावरण पूरक देखावा पर्यावरणपूरक सजावट करून, पर्यावरण पूरक देवीच्या मूर्तीचे स्थापना करून पर्यावरण पूरक नवरात्रौत्सव साजरा करावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कुंदन सुरेश पाटील यांनी केले आहे. सदर देवीचे विसर्जनाचा कार्यक्रम गुरुवार दि. 6/10/2022 रोजी होणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *