कोरपण्याची भैरवी झाली फिजिओथेरपिस्ट

 

लोकदर्शन👉मोहन भारती

कोरपना – महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक द्वारा बी पी टी एच बॅचलर ऑफ फिजिओथेरपीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत कोरपना येथील भैरवी विनोद मालेकर हीने फिजिओथेरपिस्ट ची पदवी प्राप्त केली आहे.
ती पिंपरी चिंचवड पुणे येथील चैतन्य मेडिकल फाउंडेशन कॉलेज ची विद्यार्थीनी होती. इंटरशिप नंतर ती आपली रुग्ण देणार आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील ,कॉलेजचे प्राध्यापक यांना दिले आहे. ती कोरपना येथील प्रतिष्ठित कापड व्यावसायिक विनोद मालेकर यांची कनिष्ठ कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होतं आहे. तिचे माजी प्राचार्य संजय ठावरी, माजी नगरसेवक सुभाष तुराणकर यांनी व नागरिकांनी
अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here