नागपुर शहरात नवरात्रची धूम गौरव खन्ना यांच्या हस्ते गायत्री भारतीला पुरस्कार प्रदान

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर दिनांक ३ऑक्टोबर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरोना मुळे 2 वर्ष नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करता आला नाही
मात्र यावर्षी कोरोना चे निर्बंध उठविल्यामुळे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहेत. अश्यातच नागपूर येथे रायसोनी शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालया अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . त्या स्पर्धेत मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना फेमस टी व्ही कलाकार गौरव खन्ना यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले त्यापैकी व्दितीय क्रमांकचा पुरस्कार सिव्हिल इंजिनिअरची विद्यार्थिनी गायत्री भारतीला देण्यात आला

शहरातील भवानी माता व महालक्ष्मी मंदिरात महिला भाविकांची गर्दी दिसून येत आहेत,
शहरातील प्रमुख रस्त्यावर आकर्षक विद्दुत रोषणाई करण्यात आली आहे., दांडिया बघण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे., विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. आहे, त्यामूळे विद्यार्थ्याचा उत्साह वाढला आहे, शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवला येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here