द्रोणागिरी शहरात अंतिम संस्कारासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याची शिवसेनेची मागणी.

 

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे )


दि 30 एप्रिल उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरात नवीन नोड (वसाहत )वसत आहे. येथे अनेक कुटुंब राहायला आले आहेत आणि येत आहेत.द्रोणागिरी शहरातील रहिवासी नागरिकांना स्मशानभूमीचे सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे कारण आजूबाजूच्या गावातील लोक द्रोणागिरी शहरातील रहिवाशांना अंत्यसंस्कारासाठी समशानभुमीचा वापर करून देत नाही. त्यामुळे भविष्यात ही समस्या अधिक तीव्र समस्या बनणार आहे.त्यामुळे द्रोणागिरी नोड मध्ये अंतिम संस्कारासाठी तात्पुरती का होईना त्वरित व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी सिडको प्रशासनाकडे पत्र व्यवहाराद्वारे केली आहे.

द्रोणागिरी नोडमध्ये नियोजनबद्ध अंतिम संस्कार ची सुविधा उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जनतेतून, स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी द्रोणागिरी शिवसेना शहर शाखा सतत पाठपुरावा करत आहे. सिडकोने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास एखाद्या प्रेताचे अंतिम संस्कार न झाल्यास शहरातील सर्व लोक त्यांच्या मूलभूत सुविधांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरतील. त्यामुळे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्वरित स्मशानभूमीची व्यवस्था करावी अशी मागणी द्रोणागिरी शिवसेना शहर शाखाप्रमुख जगजीवन भोईर यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *