आमदार अनिल भाऊ बाबर, तानाजीराव पाटील,सांगली बँक संचालक, यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी ग्रामपंचायत दलित वस्ती सुधार योजना निधितुन आटपाडी ग्रामपंचायत चे काम प्रगती पथावर !

 

लोकदर्शनआटपाडी ;👉 राहुल खरात

वार्ड नंबर ५
खंदारे गल्ली, ऐवळे गल्ली व आंबेडकर नगर या ठिकाणी पाणी पुरवठा पाईप लाईन करणे या चालु असलेल्या कामाची पाहणी आटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट श्री.धनंजय पाटील यांनी केली तसेच भागातील समस्या जाणून घेतल्या. प्रलंबित प्रश्न मार्गी लावला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश मरगळे व श्री. बाळासाहेब मेटकरी, इंजिनियर श्री. शब्बीर शेख, मापटेमळा ग्रामपंचायत उपसरपंच श्री. धनाजी खिलारी, श्री. उत्तमराव बालटे, आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. डि.एम. पाटील सर, श्री. नितीन चोथे, श्री. बाबु खाटीक, डॉक्टर श्री.विष्णु पाटील, श्री. अभिजित ऐवळे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आमदार श्री अनिल भाऊ बाबर व श्री.तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ.वृषाली पाटील यांच्या पावने चार वर्षाच्या कार्यकाळात अनेक रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, बंदिस्त गटरीची कामे, पेव्हींग ब्लॉग बसवणे, हायमास्ट लाईट पोल लावणे अशा प्रकारची अनेक विविध विकासकामे वेगवेगळ्या भागात वरचेवर चालु असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आटपाडी ग्रामपंचायत ला आर्थिक नीधी प्राप्त झाला त्यामुळे आत्ता सर्वच वार्ड नंबर १ ते ६ मध्ये प्रत्यक्षात २६ विकास कामे चालू झाली आहेत, तसेच सर्वच वार्ड नंबर १ ते ६ मध्ये इतर नवीन ३५ विकास कामांचे टेंडर मंजूर करण्यात आली आहेत त्यामुळे या २ दिवसात या ३५ नविन विकास कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील, त्यामुळे या आठवड्यात ही नवीन ३५ विकास कामे चालू होणार आहेत. आता प्रत्यक्षात चालू असलेली 26 विकासकामे व या २ दिवसात कार्यारंभ आदेश देण्यात येणारे नवीन ३५ विकास कामे अशी एकूण तब्बल ६१ नवीन कामे या मध्ये नवीन रस्ते करणे, बंदिस्त गटर करणे, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे अशी वेगवेगळी एकुण ६१ विकास कामे एका महिन्यात एका वेळेस चालू असण्याची आटपाडी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
तसेच आत्ता आणखीन अर्थिक निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे उर्वरित इतर सर्वांचीच विकास कामे आपल्या सर्वांचे सहकार्याने वेळेत पुर्ण होतील, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सौ.वृषाली पाटील यांनी केले.

आटपाडीतील जनतेने ज्या विश्वासाने गावची जबाबदारी दिली, त्याच विश्वासाने दिलेली आश्वासने आमचे कार्यकाळात पूर्ण करु असे मतही सरपंच वृषाली पाटील यांनी व्यक्त केले.
दिनांक २९ एप्रिल २०२२

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *