कुकुडसाथ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

दिनांक २६/०४/२०२२ ला एक महिना एक कार्यक्रम या उपक्रमांतर्गत कुकुडसाथ गट ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले विद्यालय , व अक्षय ज्योत नेत्र हॉस्पिटल आणि शिक्षक सामाजिक संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या शिक्षिका व शिक्षक सामाजिक संघटन अध्यक्षा कु. भुवनेश्वरी गोपंवार तर उद्घाटक म्हणून गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ वंदना ताई होते याप्रसंगी डॉक्टर अक्षय चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण यांचेही मार्गदर्शन लाभले अंबुजा सिमेंट चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जितेंद्र बैस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात उपसरपंच गजानन पाटील आस्वले ग्रामपंचायत सदस्या सौ. मीनाताई आत्राम ,सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र ब्रिगेडचे किशोर निब्रड,सुभाष आस्वलेशिक्षक प्रेमी सदस्य शाळा समिती जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांची उपस्थिती होती.या शिबिरात 150 गावकऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले विद्यालय च्या शिक्षीका व शिक्षक सामाजिक संघटन च्या अध्यक्षा भुवनेश्वरी धर्मपुरीवार गोपमवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन गर्जे सरांनी केले.पाहुण्यांना नाश्ता व गावकऱ्यांना जेवण भूमिपुत्र संघटनेकडून देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here