बाबासाहेबांची विचारधारा म्हणून थापा मारणाऱ्या संघटनेपासून खबरदारी घ्या. -रमेश जीवने,                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
बाबासाहेबांची विचारधारा म्हणून थापा मारणाऱ्या संघटनेपासून रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी. कारण विचारधारेच्या नावाखाली नानाविध पक्ष- संघटनेने प्रदुषण निर्माण करुन बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षावर ग्लानी आणली असून बाबासाहेबांची विचारधारा केवळ बाबासाहेबांच्या पक्ष- संघटनेतच असते. त्यामुळे ज्यांना बाबासाहेबांचे विचार अंगीकाराचे असेल त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा स्वीकार करून पक्ष संरक्षण आणि संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन रिपब्लिकन चळवळीचे अभ्यासक मा. रमेश जीवने, यवतमाळ यांनी व्यक्त केले. ते राजुरा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत अध्यक्षस्थानावरून बोलतांनी व्यक्त केले.

यंग मॅन बुद्धिस्ट वेल्फेअर असोसिएशन, बुद्ध भूमी, बसस्थानक समोर, राजुरा द्वारा दिनांक १६ एप्रिल २०२२ रोज शनीवारला साय. ३:३० वाजता समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंघटनेच्या वतीने रिपब्लिकन चळवळ अभियान अंतर्गत विषय: “भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातृसंघटनाचे स्वरूप आणि कार्य” या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानमालेत आदरणीय भंते धम्मानंद, पुणे यांनी दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाच्या दहा उद्दिष्टांवर जनमानसात कार्य करण्याचे महत्त्व साध्या आणि सोप्या भाषेत धेय्य व उद्दिष्टे विशद केले. तसेच ऍड. सत्यविजय उराडे, जेष्ठ मार्गदर्शक, समता सैनिक दल, चंद्रपूर यांनी बाबासाहेबांच्या मातृसंघटनेच्या माध्यमातून एकजुट संघटनशक्ती निर्माण करायची आवश्यकता, यांवर आपले मनोगत व्यक्त केले.

मार्शल सर्वानंद वाघमारे, मार्शल निवारण कांबळे, धर्मू नगराळे, भगीरथ वाकडे, ऋषी वाघमारे, प्रदिप निरांजने, राजरत्न मून, वंदनीय भंते कश्यप, अरुण देठे, सुरेश मेश्राम, भगवान नगराळे, भानुदास पाटील, दिलीप देठे, ज्योतीताई धोंगडे, आशय बोरकर, शारदा शिंदे, सचिन पिपरे, प्रविण ताकसांडे, सुरज उपरे, दिनेश गायकवाड, डिकेश्वर बेसेकर भुरकुंडा, लहानुजी झाडे, आसिफाबाद, सुभाष शिरटकर, मार्शल राजकुमार नरवाडे, सिद्धांत रामटेके, उपरवाही, बंडूजी चाफले, सतिश कांबळे, शंकर दुर्गे, कविता उपरे, संध्या चांदेकर, सुभाष ताकसांडे, ऋषी गेडाम, चंद्रशेखर मालखेडे, राजहंस पिपरे, ईश्वर उमरे, देवानंद उपरे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमांचे संचालन आणि आभार प्रदर्शन बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक तथा रिपब्लिकन जागृती अभियानचे आयोजक अशोककुमार उमरे गडचांदूर यांनी, केले, प्रास्ताविक मातृसंघटनाचे प्रचारक व यंग मेन्स बुद्धीस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष चरणदास नगराळे, राजुरा स्वागत गीतांचे सादरीकरण भिमराव खोब्रागडे यांनी केले.

सायंकाळी के. राजू प्रस्तूत भीमगीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सत्यपाल कातकर, मनोवैज्ञानिक तथा लेखक, राजुरा यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुनील रामटेके, सामाजिक कार्यकर्ते, किशोर रायपुरे, जेष्ठ सल्लागार, वंचित आघाडी, वासुदेव माऊलीकर, सचिव, वंचित आघाडी, गणपत पुणेकर, अध्यक्ष, सं. ह. सं. व.स. संघटना, राजुरा, बंडू वनकर, पत्रकार, देशोन्नती, विजय उपरे, माजी संचालक, कृ. उ. बा. स.राजुरा.होते,

कार्यक्रम च्या यशस्वीतेसाठी कल्पनाताई कोल्हे, संध्याताई निखाडे, जयाताई टिपले, सुमनताई वाघमारे, एस. एन. करमनकर, तुळसाबाई खडसे, विमलबाई पडवेकर, विलेखा उपरे, प्रतिभा साखरकर, प्रमिला दुर्योधन, सिमा निरंजने, शोभा कोल्हे, शेवंता कोल्हे, शीलाताई करमनकर, चंद्रभागाबाई तावाडे, शारदा जगताप इत्यादींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here