श्री.मुनिनाथ महाराज पुण्यतिथी    महोत्सवास भाविक भक्त भजनात दंग.                                                               

. लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- १९/०३/२०२२ :-* श्री . दिगंबर मुनिनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध भजनी मंडळाने तेलगु , मराठी , कन्नड , हिंदी भजन गीताने रंग भरला यात झाले भाविक भक्त बंधू भगिनी दंग ,
श्री . दिगंबर मुनिनाथ सांस्कृतिक भजन मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री . मुनिनाथ महाराजांचे ४६ वे पुण्यतिथी महोत्सव अतिशय भाक्तीभावाने साजरा करण्यात आला . या पुण्यतिथी महोत्सवास भजन , किर्तन , गीता पारायण , काकड आरती , हरिपाठ , प्रवचन , अन्नदान , महापुजा महाआरती अशा वविध धार्मिक व सामाजिक प्रमाणे कार्यक्रम साजरा करण्यात आला . सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सिध्दारुड भजनी मंडळा , श्री मुनिनाथ महाराज भजनी मंडळ यांच्या संयुक्त प्रमाणे कन्नड , हिंदी , तेलगु मराठी या भजनी गिताचा है भजगीते सादर करून भाविक भक्तांचे मनोरंजनासह भक्तीमय वातावरण निर्मिती केली .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या भजन कार्यक्रमास श्रीनिवास चिलवेरी , श्रीनिवास कुसुरकर , नागनाथ कारमपुरी , प्रियंका कुसुरकर , किरण श्रीचिप्पा कविता कैरमकोंडा , लक्ष्मीबाई गेट्यांल , निलाबाई चिलवेरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते .
*●===.==.======================.===
*फोटो मॅटर : – श्री . दिगंबर मुनिनाथ महाराजांचे पुण्यतिथी महोत्सवास भजनाचे कार्यक्रम साजरी करतांना भजनी मंडळाचे कलाकार व भाविक भक्त दिसत आहेत .*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here