कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या न. प. कर्मचा-यांच्या वारसांना ५० लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वाटप.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– नगर परिषद राजुरा मध्ये कार्यरत कर्मचारी सुधाकर शंकर कोंडावार हे कोविड- 19 कोरोना साथ रोगामध्ये कर्तव्यावर कार्यरत असताना त्यांचा कोरोनामुळे दि. 02.05.2021 ला मृत्यु झाल्याने त्यांच्या पात्र वारसांना महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग तर्फे रुपये 50,00,000/- पन्नास लक्ष रुपये सानुग्रह सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात आले. नगर परिषद सभागृहामध्ये त्यांची पत्नी श्रीमती संध्या सुधाकर कोंडावार यांना रुपये 50,00,000/-पन्नास लक्ष रुपयाचा धनादेश नगर परिषद राजुराचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुर्यकांत बंडुजी पिदुरकर यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.
या प्रसंगी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगरध्यक्ष सुनिल देशपांडे, माजी बांधकाम सभापती आनंद दासरी, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, न प चे प्रशासकीय अधिकारी विजय जाभुळकर, पाणी पुरवठा अभियंता संकेत नंदवशी, सहाय्यक रचना अभिनंदन काळे, संगणक अभियंता ज्ञानेश सोनवणे, लेखापाल अश्विन कुमार भोई, मिळकत व्यवस्थापक अक्षय सुर्यवंशी, सतीश देशमुख, विरेद धोटे, संजय जोशी, मनोज राजगडे, बापुराव गोगलवार यासह न प कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here