उपजिल्हा रुग्णालयात शुद्ध व शितल पेयजल मशिनचे उद्घाटन. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रोटरी क्लब राजुरा द्वारा आयोजित शुद्ध व शितल पेयजल मशिनचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या कडक उन्हाचे दिवस असून येथे येणाऱ्या सर्व रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच सर्वांना शुध्द व शितल पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लब ने येथे नवीन मशीन भेट दिली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज संपन्न झाला.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकिय अधिक्षक डॉ लहू कुलमेथे, डॉ जाधव, रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष नवल झवर, सचिव कमल बजाज यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here