” वालुर येथील ऐतिहासिक वारसा स्थळांची उपजिल्हाधिकारी यांच्या कडून पाहणी”

लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉 महादेव गिरी

वालुर या गावाला प्राचीन व ऐतिहासिक वारसा स्थळांचा वारसा लाभलेला आहे. या ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करून शुशोभीकरण करण्याची आवश्यकता असल्याने
येथील ऐतिहासिक वारसा असलेले मंदिर, मठ ,बारव यांचे जतन करून भविष्यकाळात त्याचे सौंदर्य कायम राहावे म्हणून सेलूचे उपजिल्हाधिकारी करुणा संगेवार, परभणी चे जिल्हामाहिती अधिकारी सुनिल पोटेकर, पुरातन वास्तुशास्त्रन शौनक कुलकर्णी, सेलु रेल्वेप्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवनारायण मालानी, मल्हारीकांत देशमुख तसेच वालुर चे सरपंच संजय साडेगावकर, सुरेंद्रजी तोष्णीवाल, मारोतराव बोडखे, विलास सोनवणे, नारायण साडू अष्टकर,दत्ता राख, गोपाळ आबुज,रामभाऊ धापसे रामप्रसाद राख, वालुर चे तलाठी निलेश परचे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी करुणा संगेवार मॅडम यांनी प्राचीन वास्तू चे महत्व विषद केले तसेच प्राचीन वास्तू पिढ्यानपिढ्या टिकून रहावे असे आव्हान ग्रामस्थांना केले.यास गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी वालुरच्या प्राचीन वास्तूचे स्वच्छता अभियान लवकरच हाती घेण्यात येऊन ऐतिहासिक वारसा जपण्यात येईल अशी ग्वाही वालूर चे सरपंच संजय साडेगावकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here