विठ्ठल मंदिरात रामनवमी साजरी !


गडचांदूर,,,
लोकदर्शन 👉मोहन भारती
रामनवमी निमित्ताने विठ्ठल मंदिरात रामजन्म उत्सव थाटात साजरा करण्यात आला .श्री तुकाराम महाराज आडे तेलंगणा उतनूर यांच्या पालखी चे स्वागत उद्धव पुरी ,नगराध्यक्ष सविताताई टेकाम, नगरसेवक पापया पोंनमवार ,विक्रम येरणे, नगरसेविका मिनाक्षीताई एकरे, अशोक एकरे, संतोष महाडोळे, मयूर एकरे ,अतुल गोरे यांनी केले व महाप्रसाद वितरित केला, विठ्ठल मंदीर ट्रस्ट चे अध्यक्ष ह भ प श्री दिपक महाराज पुरी व भाऊराव पाटील एकरे यांनी रामायण वाचून राम जन्म निमित्य विठ्ठल मंदिरात विधिवत पूजाअर्चा केली . महिलांनी पाळणे व भजन गाऊन उत्सव साजरा केला . प्रा विजय आकनूरवार यांनी सर्व भक्तांचे आभार मानले
कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here