बांबु लागवड मेळाव्यास ना . जयंतराव पाटील आटपाडीस येणार !

 

*___________________________*
लोकदर्शन आटपाडी दि . ६ (प्रतिनिधी ) 👉राहुल खरात


बांबु लागवडी संदर्भाने आटपाडीत होणाऱ्या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे ना . जयंतराव पाटील साहेब यांनी आश्वासन दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील यांनी दिली .
राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील साहेबांची इस्लामपूर येथे सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रवादीचे खानापूर आटपाडी मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका सरचिटणीस विजयराव पुजारी यांनी चर्चा केली .
आटपाडीसह माणदेशात डाळींब क्रांतीसारखी नवक्रांती घडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांबुची लागवड करण्यासंदर्भाने या भेटीत चर्चा करण्यात आली . ना . जयंतराव पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या बांबु लागवडीचा उपक्रम आटपाडीत सुरु करण्यात आला होता . बांबु लागवडीस व्यापक स्वरूप देण्याचे , शासनाकडून प्रोत्साहन मिळावे आणि शेतकर्‍यांच्यात मोठी जागृती व्हावी या उद्देशाने आटपाडी येथे बांबु लागवडी संदर्भाने मोठा मेळावा घेण्याचा मनोदय आनंदरावबापू पाटील यांनी बोलून दाखविला आणि या मेळाव्यास येण्याचे मंत्री महोदयांना निमंत्रण दिले . एप्रील च्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या मेळाव्यासाठी येण्याचे नामदार महोदयांनी आश्वासन दिले . डाळींब फळ पिका संदर्भाने ही उद्‌भवलेल्या समस्या, प्रश्न यावर अधिकारी, डाळींब तज्ञ यांच्या समवेत एक बैठक नामदार महोदयांनी लावावी अशी विनंती आनंदरावबापु पाटील यांनी केली . लवकरच तशी बैठक घेऊ असे ही ना . जयंतराव पाटील साहेब यांनी स्पष्ट केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here