*विचार नष्ट करायचे असेल तर पहिले संघटन नष्ट करण्यात येते.* ,,,सचिन पिपरे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
*विचार नष्ट करायचे असेल तर संघटन नष्ट करण्यात येते. नेमकी हीच प्रक्रिया तथागत बुद्धांच्या बौद्ध धम्म या संघटनेच्या बाबतीत आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या संदर्भात झालेली आहे. नानाविध संघटनेचे प्रदुषण निर्माण करून प्रतिक्रांतीला खतपाणी घातले आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत ६५ वर्षाच्या कालखंडात नानाविध संघटनेच्या विचारांने आपले वैचारिकतेच्या नावाने प्रदुषणाचे ग्लास भरलेले आहे. आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचे वैचारिक नाते सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आधीच्या भरलेल्या ग्लासातून सांडून जातात. बाबासाहेबांनी जसे तथागत बुद्ध यांचे बौद्ध धम्म हे संघटन शोधून त्यांचे सभासद, अनुयायी, कार्यकर्ते झाले तसे आपणालाही सम्यक चौकस बुद्धीने बाबासाहेबांच्या अधिकृत संघटना शोधून बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते बनता येते. मात्र बाबासाहेबांच्या संघटना स्वीकारण्याची आपली मानसिकता तयार केली पाहिजे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सचिन पिपरे यांनी व्यक्त केले. ते पंचशील बुद्ध विहार, डोंगरगाव येथे दिनांक २७ मार्च ला आयोजित दर रविवारी धम्म आपल्या दारी या धम्म जागृती अभियानात बोलत होते.*

*सदर कार्यक्रमांत बाबासाहेबांच्या समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी बाबासाहेबांच्या संघटना स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांच्या संघटनेच्या संविधानाचे निकष दिलें आहे. या निकषांचे प्रतिज्ञापुर्वक पालन केले तर बाबासाहेबांच्या संघटना नव्या जोमाने उभारण्यास काहीच अडथळा निर्माण होणार नाहीत. मात्र नेत्यांच्या भक्तीत रममाण असलेल्यांना नेत्यांच्या भक्तीशिवाय अन्य काही दिसत नसल्याने त्यांच्यातील चौकस बुद्धी गहाण पडलेली आहे. या भक्तीच्या आवर्तातून जेवढ्या लवकर आपण बाहेर पडून बाबासाहेबांनी संघटनेसाठी दिलेल्या निकषानुसार एकसंघ संघटनशक्ती निर्माण करणार नाही तोपर्यंत कार्यकर्ता निरर्थक धोब्याचा हेला म्हणून राबराब राबला तरी काहीच साध्य होणार नाही.*

या प्रसंगी आदरणीय भंते कश्यप यांनी बुद्ध वंदना दिल्यानंतर बावीस प्रतिज्ञेचे आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाचे महत्त्व कथन करून येणाऱ्या जनगणनेत बौद्धांनी जाती न लिहिता केवळ बौद्ध लिहून बौद्ध धर्माची लोकसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले.

*कार्यक्रमास जसविंदर उपरे, डेरकर, प्रभाकर दुर्योधन, योगेंद्र नळे, शंकर ताळे, अशोक नळे, मारोती रामटेके, विना झाडे, स्नेहा उपरे, गौतमी निरांजने, शालिनी ताकसांडे, मंदाबाई निरांजने, सविता गव्हारे, सुभद्राबाई गोवर्धन, रंजना दुर्योधन, शेवंता जुनघरे, पंचशीला उपरे इत्यादीने सहकार्य केले.*
,,फोटो,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *