नरेशबाबु पुगलियां च्या मध्यस्थीने अखेर कामगार कुटुंबीयांना मिळाला न्याय !

       लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत
कोरपना :-
मराठा अंबुजा सिमेंट उपरवाही येथील कंत्राटी कामगार भाऊराव महादेव डाखोरे व संतोष हरी पवार हे दोन्ही कामगार गडचांदूर वरुन कामावर येत असताना दि. २२ मार्च २०२२ मंगळवार ला सकाळी ८.१५ मि. दरम्यान सना पेट्रोल पंपा जवळ केटीसी कंपनी च्या ट्रक क्रमांक टि एस ओ १० सी ०२२५ च्या वाहनाने धडक दिली यात दुचाकीस्वार भाऊराव डाखोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर संतोष हरी पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर डॉ मेहरा इस्पितळ चंद्रपुर येथे सध्या उपचार सुरू आहेत.
ह्या दूरघटनेमुळे कामगारांत प्रचंड रोष निर्माण झाला. दरम्यान, नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातील कामगार संघटनेने अंबुजा व्यवस्थापन तथा के. टि. सी. ह्या कंपनी कडे मृत्यु झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना तथा गंभीर जखमी झालेल्या पवार कुटुंबियांना आर्थिक मोबदला मिळवुन देण्यासाठी आंदोलन पुकारले.
यात अंबुजा व्यवस्थापन, KTC वाहतूक कंपनी व नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वाखालील मराठा कामगार संघटनेने अखेर वाटाघाटीतून मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाख तर जखमी च्या विवाहितेला 2.5 लाख रुपयांचा धनादेश आज पत्रपरिषदेत प्रदान करण्यात आला. शिवाय, अपघाती मृत्यूचे विविध लाभही मिळणार आहेत.
या दुर्दैवी प्रसंगी काही विघनसंतोषिनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिवचंद्र काळे व साईनाथ बुचे यांनी केला. तथापि, पुग्लियांच्या नेतृत्वात तावून/सुलाखून निघालेल्या कामगारांनी 2 दिवस KTC कंपनीचें वाहन लोडिंग बंद केल्याने अखेर व्यवस्थापणेने नमते घेत साऱ्या मागण्या मान्य केल्याचे पत्रपरिषदेत स्पष्ट करण्यात आले.

या संदर्भात आज मराठा सिमेंट कामगार संघटनेच्या कार्यालयात झालेल्या पत्र परिषदेत कामगारनेते तथा जिप. सदस्य शिवचंद्र काळे, L&T कामगार संघटनेचे सरचिटणीस साईनाथ बुचे, मराठा कामगार संघटनेचे सरचिटणीस अजय मानवटकर, कार्याध्यक्ष सागर बलकी, माजी सरपंच गुणवंत तलांडे, गजानन मटाले, मुरलीधर बोडे , वासुदेव बलकी प्रभृती उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *