लोकदर्शन 👉 राहुल खरात
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचलित व सांगली जिल्हा परिषद डायट सांगली आणि पंचायत समिती पलूस आयोजित स्टार्स प्रकल्पांतर्गत आयोजित पलूस केंद्रातील शिक्षकांचे केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षणात ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी माधुरी गुरव, पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे,जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य बाबासाहेब लाड,विषयतज्ञ सुवर्णा थोरात, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा म्हेत्रे, सौ संजीवनी पाटील,वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण,उज्वला पाटील उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी अशोक जाधव म्हणाले की शाळापूर्व तयारी अभियान हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी,शाळा दर्जेदार बनवण्यासाठी,शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणारा दाखल पात्र विद्यार्थ्यी भावनिक, सामाजिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा उपक्रमांची शंभर टक्के अंमलबजावणी शाळापातळीवर, झाली पाहिजे.या एक दिवशीय शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षणात मार्गदर्शक सिराज सुतार,वर्षा ढेरे,स्मिता लाड या तज्ञ मार्गदर्शकांनी या उपक्रमाची उदिष्टे,मुलांचे विविध टप्प्यावरील मुल्यमापन,प्रगतीपत्रक भरणे आदी विषयांवर मार्गदर्शन करुन पी पी टी चे सादरीकरण केले.या प्रशिक्षण वर्गास पलूस केंद्रातील पहिलीला शिकवणाऱ्या सर्वच शिक्षकांनी सहभाग घेऊन विविध प्रकारचे स्टॉल उभारणी करून शैक्षणिक साहित्याचा शाळा पूर्वतयारी अभियानात कसा वापर करु व अअभियान कसे राबवले जाईल याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.प्रशिक्षण वर्गात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण, अंगणवाडी पर्यवेक्षिका संजीवनी पाटील,सौ.सुवर्णा म्हेत्रे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षणाचा लाभ पलूस केंद्रातील पहिली ते पाचवीला शिकवणार्या सर्व शिक्षकांनी घेतला.प्रशिक्षण वर्गाचे स्वागत व प्रास्ताविक आणि संयोजन केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे यांनी केले तर आभार मारुती शिरतोडे यांनी मानले.