*लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा* खेडोपाडी तातडीने एसटीची सेवा सुरू करा

लोकदर्शन 👉 राहुल खरात


*⭕एसटी वाचवा एसटी वाढवा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

⭕*आज सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन**

महाराष्ट्रातील सर्वात मोठा शासन अंगीकृत उपक्रम म्हणून राज्य परिवहन महामंडळाकडे पाहिले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मोठे शासकीय वाहन असणार्या एसटी ने जनतेला 29 प्रकारच्या सवलती दिल्या असून लाखो मुलं एसटी मुळेच शिक्षित झाली आहेत. एसटी मुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल भाजीपाला द्राक्ष दूध शहरापर्यंत पोचलं.त्यांच्या जेवणाचे डबेही पोहचवले. राज्याच्या कानाकोपऱ्यात गाव तिथे रस्ता रस्ता तिथे एसटी हे सूत्र महामंडळाने घेतल्यामुळे ग्रामीण भागात एसटी सर्वदूर पोहोचली. मुली आणि स्त्रिया यांचे सर्वात सुरक्षित वाहतुकीचे एकमेव साधन म्हणून एसटी कडे पाहिले जाते.मात्र गेली काही महिने कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे एस.टी.ची चाके बंद आहेत. याचा अत्यंत विपरीत परिनाम विद्यार्थी, सामान्य जनता,कामगार कष्टकरी यांचेवर झाला आहे. ,तेव्हा महाराष्ट्र सरकारने तातडीने एसटी महामंडळात वाढलेला भ्रष्टाचार थांबवावा. सामान्य जनता कष्टकऱ्यांची जीवन वाहिनी विद्यार्थ्यांची शिक्षण वाहिनी असलेली एसटी डबघाईला येऊ नये आणि एसटी महामंडळाचा कारभार सुधारावा म्हणून महाराष्ट्रातील जनतेनेच पुढाकार घेतला असून एसटी वाचवा, एसटी वाढवा समिती राज्यपातळीवर गठीत झालेली आहे.या समितीच्या मागण्यांचे निवेदन आज मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे, विद्यार्थ्यांचे हित पाहून आणि अवैध प्रवासी मार्गाने होणारी सामान्यांची लूट पाहून सरकारने त्वरित एसटी पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आणावी. एसटी ही महाराष्ट्रातील समस्त गोरगरीब बहुजनांचे सर्वात सुरक्षित सरकारी वाहन असल्यामुळे एस.टी.चे खाजगीकरण कोणत्याही प्रकारे अजिबात करू नये.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय जाहीर करावा. खेडोपाडी एसटीची सेवा तातडीने सुरू करण्यात यावी. एसटी महामंडळातील भ्रष्टाचाराला पूर्ण आळा घालावा. आज सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना जनता दल सेक्युलर से ऍडव्होकेट के डी शिंदे, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे अध्यक्ष दगडू जाधव ,सरचिटणीस हिम्मतराव मलमे ,विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव ,पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे, तसेच आनंद खांडेकर, विकास मगदूम, वैभव शिरतोडे राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम, जनार्दन गोंधळी ,ऋतुराज शिरतोडे,एस.टी.कर्मचारी युनियनचे दिनेश माने यांचेसह विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *