कळमना येथे ग्रामपंचायतचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕जागतिक जलदिनानिमित्त उपक्रम.

राजुरा :– जागतिक जलदिनाचे औचित्य साधून जि. प. उच्च प्राथमिक शाळा कळमना येथे ओबीसी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कळमना च्या पुढाकाराने शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषदचे विदर्भ सरचिटणीस तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, विद्यार्थी जीवनाचा मजबूत पाया हा प्राथमिक शिक्षण मधून निर्माण करायचा असतो. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळत नाही मात्र याही विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता लक्षात घेऊन ग्रामपंचायत कळमना ने हा उपक्रम सुरू केला आहे. शिवाय शासनाने सुध्दा ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावेत यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी तमुस अध्यक्ष महादेव ताजने, उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रा. प. सदस्य सुनिता उमाटे, रंजना पिंगे, ग्रामसेवक नारनवरे, शाळेचे मुख्याध्यापक धानकुटे सर सहाय्यक शिक्षक पेंदोर सर, गोखरे मॅडम, दुबे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here