भुतियापंती या भयपटाचा पोस्टर लाँचिंग सोहळा संपन्न…।

मुंबई-चर्चगेट (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
बे एके बे च्या अपूर्व यशानंतर दिग्दर्शक संचित यादव यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून आपल्या नव्या भुतियापंती या सिनेमाचा पोस्टर लाँचिंग सोहळा सोमवार दिनांक २१ एप्रिल सायंकाळी ४.०० वाजता, २० डाऊन टाऊन, इरॉस बिल्डिंग, २ रा मजला, चर्चगेट, मुंबई येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी या सिनेमाचे निर्माते विनोद बरदाडे, लेखक विनय येरापले, प्रमुख मान्यवर नितीन गोसावी, राजू बलवानी, सिने-नाट्य दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे, अमोल घोले, मयूर नाईक, उन्मेशजी आदी मान्यवर उपस्थित होते. विनोदी ढंगाने नटलेला – वेगळे कथानक असलेला आणि रहस्यमय कथेवर आधारीत थरकाप उडविणाऱ्या ‘भुतियापंती’ ह्या मराठी विनोदी भयपटात संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ – यादव, अंकुर वाढवे, अमित चव्हाण, तृशांत पाते, समीर काळंबे, सचिन खंडागळे या कलावंतांनी सहभाग घेतला असून या सिनेमाचे पोस्टर डिझाईन राज जाधव यांनी केले आहे. किमिन्ह प्रॉडक्शन प्रस्तुत आणि व्ही.बी.प्रॉडक्शन आणि थ्री स्टार एंटरटेनमेंट च्या सौजन्याने लवकरच महाराष्ट्रातील प्रेक्षागृहात प्रदर्शित होणारा हा भुतियापंती सिनेमा प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करणार अशी ग्वाही दिग्दर्शक संचित यादव यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here