यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर

 

By : Shankar Tadas

लोकदर्शन👉
*चंद्रपूरच्या मीनाक्षी वाळके यांचा सामावेश

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबईच्या, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१’ ची घोषणा करण्यात आली आहे.चव्हाण सेंटरच्या माध्यमातून युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता,साहित्य रंगमंचीय कलाविष्कार व साहित्य या क्षेत्रांतील विविध गुणवंत युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण जागतिक पुस्तक दिनी शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई -२१ येथे कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजारांचा धनादेश,सन्मानचिन्ह असे असणार आहे.
आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या *मिनाक्षी वालके* (चंद्रपूर), अश्विन पावडे (औरंगाबाद/अकोला) व सोनाली गराडे (नाशिक) या युवा उद्योजकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.या निवड समितीमध्ये आनंद अवधानी,सुनील किर्दक,दीपाली चांडक व मनोज हाडवळे यांचा समावेश होता.
*****
मुकेश वाळके यांची फेसबुक पोस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here