इन्फंट कान्व्हेंट येथे पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन.

  • o oलोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुर:– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे इयत्ता नर्सरी एलकेजी, यूकेजी च्या पालकांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धामध्ये मोठय़ा संख्येने पालकवर्गांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. या प्रसंगी सर्व विजयी स्पर्धकांना कल्याणी अभिजीत धोटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण शाळेच्या शिक्षिका विद्या आकेवार, प्रतिभा चुनें, विद्या शेरकी यांनी केले.
नर्सरी क्लास मधुन प्रथम विजेते ईशांत बालू वैद्य, रेहांश सुशील वाघमारे, तर द्वितीय स्थान धैर्य महेश पोटे, आरुषी पुष्पकुमार मेंढे तर एलकेजी क्लासमधुन अर्णव नरेंद्र हेपट, युवान कैलाश कोरवते यांनी प्रथम स्थान तर द्वितीय स्थान निदा शारीक कुरेशी, दुर्वांश गणेश बोंडे यांनी पटकावीले. युकेजी क्लासमधुन पार्थ पकंज बाराहाते, कुमुद रमेश शेरकी यांनी प्रथम स्थान पटकवीले तर द्वितीय स्थान अनुष्का अनिल यादव, पार्थ महेश थुल यांनी पटकाविले
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन सम्मानित करण्यात आले.
या प्रसंगी कल्याणी अभिजीत धोटे, मुख्यध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्यध्यापिका मंजूषा अलोने, मुख्यध्यापक रफीक अंसारी, प्री प्रायमरी शिक्षक वृंद माधुरी एरकी, नीता जक्कनवार, शिल्पा नायडू, नीतू सिंग, मनोज ठाकरे यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here