पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना इंजि. वैभव पिंपळशेंडे

लोकदर्शन 👉 मोहन भारती

मा. आशिष भाऊ देवतळे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर (ग्रामीण) यांच्या सुचनेनुसार चिंतलधाबा-घोसरी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा गंगापूर ता. पोंभूर्णा येथील नागरिकांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या लोकनेते मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच मा. श्री. देवराव दादा भोंगळे सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर यांचा मदतीने लवकरात लवकर मार्गी लावू/पूर्ण करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं.

नागरिकांच्या समस्या आणि मागण्या खालील प्रमाणे:
1. जुनगाव ते टोक रस्त्याचे थांबलेले काम त्वरित पूर्ण करणे.
2. गंगापूर येथे सामाजिक सभागृह मंजूर करणे.
3. नवीन अंगणवाडी मंजूर करणे.
4. दिव्यांगांना तीन चाकी सायकल उपलब्ध करून देणे.
5. वृद्धांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देणे.
6. जिल्हा परिषद शाळेला क्रीडा साहित्य आणि ओपन जिम साहित्य पुरवणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here