लोकदर्शन नागपूर जिल्हा प्रतिनिधी👉
जागतिक महिला दिनानिमित्त दि 13/03/2022 ला रविवार ला हनुमान मंदिर सभागृह , श्रीहरी नगर क्रमांक 3 मानेवाडा नागपूर येथे कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमा च्या अध्यक्षा सौ नलिनी ताई चंद्रकांत ढोले राज्य कार्यकारी सदस्य धनगर, अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ह्या होत्या, तसेच प्रमुख पाहुण्या सौ दिप्ती ताई काळे कार्यकारी अभियंता म्हाडा अमरावती, तसेच प्रमुख पाहुण्या श्रीमती सिमाताई नान्नोरे मॅडम सहायक संचालक वित्त विभाग भंडारा , तसेच प्रमुख पाहुण्या अँड सौ विजया ताई कानडे उच्च न्यायालय नागपूर ह्या होत्या.
जागतिक महिला दिनाचे अवचित्त साधून महिला दिना चा कार्यक्रम घेण्यात आला होता .कार्यक्रमात अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्या याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि प्रमुख पाहुण्या याना स्मरणिका आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता.त्यानंतर अँड सौ विजया कानडे मॅडम यांनी महिलांच्या अधिकार बद्दल माहिती सांगितली, तसेच सीमा नान्नोरे मॅडम यांनी महिला कर्मचारी च्या रजेविषयी माहिती दिली, तसेच दिप्ती ताई काळे यांनी महिला सक्षमीकरण याविषयी माहिती सांगितली , तसेच अनेक महिलांनी कविता चे गायन केले, आपले विचार प्रगट केले, अहिल्या देवीवर पोवाडे , नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन सौ शितल गावंडे मॅडम आणि सौ वैशाली यशवंत कातरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अनुराधा थोटे मॅडम यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ शालिनी अरविंद लोही मॅडम यांनी केले.
जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ शितल गावंडे, अनुराधा थोटे, वैशाली कातरे, शालिनी लोही, वैशाली रोकडे, चेतना रोकडे, मेघा ढोले, वैशाली ढोले, आशा माहुरे, वनिता चिडे , अर्चना ढोले यांनी विशेष प्रयत्न केले, तसेच महिला आघाडी नागपूर च्या सर्व सदस्या, तसेच राज्य कार्यकारणी आणि नागपूर जिल्हा कार्यकारी यांनी सुद्धा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले.