जिवती तालुक्यातील जि. प. शिक्षकांना बदली प्रक्रियेत मिळणार न्याय

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕*जि. प. शिक्षक बदली धोरणात जिवती तालुका १००% अवघड क्षेत्र कायम होणार.*

⭕*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आमदार सुभाष धोटे यांना आश्वासन.*

राजुरा :– जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरण मध्ये दिनांक 27/2/2017 च्या शासन निर्णयानुसार मोठा बदल करून अवघड क्षेत्र व सर्व साधारण क्षेत्र ठरविण्यात आले होते. सन 2018 मध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. यावेळी संपूर्ण जिवती तालुका 100% अवघड क्षेत्र होता. त्यानंतर कोरोना मुळे बदल्या होऊ शकल्या नाहीत. परंतु 2022 मध्ये नव्याने बदली प्रक्रिया सुरू झाली. शासनाने दिनांक 7/4/2021 ला नव्याने शासन निर्णय काढून अवघड क्षेत्राचे निकष तयार केले.
अवघड क्षेत्र निकषांमध्ये संपूर्ण जिवती तालुका निकष पूर्ण करू शकत असताना अधिकाऱ्यांनी कागद पत्रांचा आधार घेत 128 पैकी फक्त 49 गावे अवघड असल्याचा शोध लावला. जिवती तालुक्यात चार वर्षात असा काय बदल झाला याचे आश्चर्य वाटले. आपल्या बदल्या होणार नाही म्हणून शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. ही बाब जिवती तालुका अवघड क्षेत्र कृती समिती तर्फे संजय लांडे, उमाजी कोडापे, मोहन वाभिटकर यांनी क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार सुभाष धोटे यांना भेटून निदर्शनास आणून दिली. आमदार धोटे यांनी सदर समस्येचे गांभीर्य ओळखून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
आमदार सुभाष धोटे यांनी दिनांक 10/3/2022 ला मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिवती तालुका 100% अवघड क्षेत्र कायम करण्याबाबत लक्षवेधी सूचना सादर केली आहे. तसेच राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन राजुरा मतदार संघातील शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी विचारविमर्श करुन जिवती तालुका अवघड क्षेत्रामधून वगळण्याची कार्यवाही करणेबाबत उपसचिव ग्रामविकास यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून जिवती च्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून अवघड क्षेत्र निकष जिवती बाबत शिथिल करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिवती तालुक्यातील शिक्षकांच्या बदली संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *