कळमना येथे महिलादिन उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे ग्रामपंचायत कळमना व प्रेरणा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महिलादिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती गंगुबाई उमाटे होते, उद्घाटक सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांनी या महिला दिनानिमित्त सर्व महिलांनी दृढनिश्चय करून स्वतः पासून सुरूवात करून कुटुंब, गाव, देशपातळीवर आपले नाव उंचावले पाहिजे. मुला मुलींना शिक्षण, संस्कार देऊन महान पिढी घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. तिच्यामुळे घराला घरपण असते. त्यामुळे महिलाशक्तीला सर्वत्र वंदन केला जातो असे मत व्यक्त केले. या प्रसंगी मौजा कळमना ग्रामपंचायत अंतर्गत अपंगांना अपंग निधी वाटप करण्यात आला. सरपंच नंदकिशोर वाढ ई यांचा 10 मार्चला वाढदिवस आहे व पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे यांची मुलगी मानु हिचा आज वाढदिवस होता त्यानिमित्त गावकऱ्यांना मोसंबी लक्ष्मण फळ, सिताफळ अशा अनेक प्रजातीचे झाड देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष महादेव ताजणे, ग्रा प सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, रंजनाताई पिंगे, सुनिता उमाटे, जेष्ठ नागरिक सईबाई भोयर, मंगेश ताजणे, गोखले मॅडम, दूध मॅडम, प्रेरणा महासंघ कळमना च्या अध्यक्षा मीनाताई भोयर, मनीषा धनककट कोषाध्यक्षा, वैशाली अस्वले सचिव, सुचिता धांडे, अस्मिता अस्वले, सुनिता बोढाले, सुनिता मेश्राम, छाया गौरकर, माया निमकर, नंदा कौरासे, सुनिता धांडे, संगीता कुकडे, पार्वताबाई वांढरे, मिराबाई वाढई, सुषमा वाढई, मनीषा आंबीलकर, बेबी मुठ्ठलकार, अलका गेडाम, कल्पना शिरसागर, सविता सुमटकर, विनायक धांडे, सुनील मेश्राम, सुरेश चौधरी यासह गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here