अखेर वछल्लाबाईला मिळाला न्याय!

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕*विद्युत अपघातात पतीच्या मृत्यूनंतर ३.८० लक्ष रुपयांची मदत जमा*
,,,,,,,,,,,,,,,,
⭕*भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या प्रयत्नांना यश*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
कोरपना तालुक्यातील गांधीनगर येथील नामदेव शंभू पावडे यांचा तुळशी येथे त्यांच्या शेतात विद्युत अपघातात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते.

याकरिता त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे अर्ज करून आर्थिक मदतीची मागणी केली परंतु त्यांना विभागाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही,त्यांनतर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्याकडे सदर प्रकरणासंदर्भात माहिती दिली,त्यांनी याबाबत विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या कार्यलयात याबाबत वारंवार संपर्क साधला व त्रुटीच्या कागदपत्रांची पूर्तता केली.
त्यांनतर विद्युत वितरण कंपनीने श्रीमती वछल्लाबाई नामदेव पावडे यांच्या खात्यात ३.८० लक्ष रुपयांची मदत खात्यात जमा केली आहे.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here