आमदार सुभाष धोटेंचा एसटी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात : १२० अन्नधान्य किट चे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– महाराष्ट्रातील एसटी कामगारांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू असून यामुळे एसटी च्या अनेक बांधवांना संकटातून जावे लागत आहे. ही परिस्थीती लक्षात घेता आमदार सुभाष धोटे यांनी माणूसकीच्या नात्याने राजुरा विधानसभा क्षेत्रातील एसटी कामगार बांधवांची आज महाशिवरात्रीनिमित्त राजुरा आगारात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात एक हात मदतीचा म्हणून १२० अन्नधान्य किट चे वितरण केले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ग्रामीण व शहरी गोरगरीब नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी वर्ग, मध्यम वर्ग या सर्वांसाठी एसटीची भुमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. तेव्हा सरकार आणि आंदोलक एसटी कामगार बांधव यांच्यात सकारात्मक तोडगा लवकरात लवकर निघायला हवा आणि सर्वांची लाडकी लालपरी पून्हा पुर्वी प्रमाणे सर्व सामान्यांच्या सेवेत रुजू व्हावी असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जि. प. सदस्य मेघाताई नलगे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाझ अहमद, सेवा कलाश फाऊंडेशन चे अध्यक्ष अभिजीत धोटे, अॅड चंद्रशेखर चांदेकर, राजुरा आगारातील एसटी कामगार गजानन बोरकुंटवार ,सुधाकर सोळंके, संतोष जाधव, राकेश पुरटकर, समीर येशेकर, सुभाष जाधव, गणेश सातपुते, बंडू नगराळे, महादेव ढोणे, सौ. कुंदा कडुकर, सौ. तरन्नुम शेख यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here