महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर कमल स्पोर्टींग क्लबव्दारा* *साबुदाना खिचडीचे भाविकांना वाटप

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील अग्रणी कमल स्पोर्टींग क्लबव्दारा महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर श्री अंचलेश्वर मंदीर परिसरात उपस्थित भावीक भक्तांना साबुदाना खिचडीने वाटप पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते करण्यात आले तसेच भाविकांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपा नेते खुशाल बोंडे, कमल स्पोर्टींग क्लबचे अध्यक्ष तथा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजपा किसान आघाडीचे राजुभाऊ घरोटे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यावेळी राहुल गायकवाड, जगदीश दंडेले, राहुल बोरकर, विशाल बुरडकर, प्रविण चुनारकर, स्वप्नील मुन, गौतम यादव आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचा लाभ शेकडो भाविक बांधव व आबालवृध्दांनी घेतला. मागील अनेक वर्षांपासून महाशिवरात्री निमित्त कमल स्पोर्टींग क्लब भाविकांना उपवासाचे पदार्थ वितरण करून लोकांची सेवा करण्याचे कार्य करीत आहे. या कार्यक्रमासाठी या स्पोर्टींग क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. भाजयुमो तसेच कमल स्पोर्टींग क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here