कोरपना तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करुन निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन व निषेध व्यक्त करन्यात आला प्रमुख उपस्थिती श्री अरुण मडावी माजी सरपंच चेन्नई,श्री अमोल आसेकर नगरसेवक कोरपना,श्री अनिल कवरासे शाखाध्यक्ष कोरपणा,श्री शशिकांत आडकिने माजी सरपंच माथा, श्री अमोल सुर, श्री देविदास तुरनकर, श्री देविदास झाडे, श्री शंकर चिंचोलकर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात मा ना श्री नारायण राणे केन्द्रिय मंत्री भारत सरकार यांना बेकायदेशीर बळजबरीने अटक करण्यात आली महाराष्ट्र सरकारने पदाचा दुरुपयोग करून कोणतेही कारण नसताना पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावल्या गोर गरीब जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारला बरखास्त करण्यात यावे असे मत हिवरकर यांनी व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच निवेदन तहसीलदारा मार्फत राज्यपालांना देण्यात आले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन अनिल कौरासे यांनी केले तर आभार शशीकांत आडकिने यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here