

lokadarshan 👉 By Shivaji Selokar
बल्लारपूर,
डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित कृषी महाविद्यालय,दारव्हा येथील सातव्या सत्राची विद्यार्थीनी कु,आंचल राजेश मांढरे, हिने बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील शेतशिवारात जाऊन कापूस पिकावर येणाऱ्या कीटकांचे निरीक्षण केले,निरिक्षण मध्ये आढळून आलेल्या मावा किडीचे नियंत्रण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले, रासायनिक औषधी ची फवारणी करताना शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क,हातात ग्लोज,डोळ्यावर गागल, वापरण्याचे आवाहन केले, फवारणी साठी शुद्ध पाण्याचा वापर करावा, गढूळ पाणी वापरल्यास औषधी वर विपरित परिणाम होऊन ,औषधी ची शक्ती कमी होते हे पटवून दिले,तसेच शेतकऱ्यांना फायदेशीर व नुकसान कारक किटक कोणते आहेत, यासंदर्भात मार्गदर्शन केले ,याप्रसंगी शेतकरी वसंतराव धदरे,यांची उपस्थिती होती,
प्राचार्य प्रभाकर बोबडे,कार्यक्रम अधिकारी प्रा, पंकज खाडे ,किटकशास्त्र विभाग प्रमुख, प्रा, मंगेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला,