प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालडोह चे मुख्याध्यापक राजेंद्र परितेकी यांचा केला सत्कार

लोकदर्शन 👉सतिश बिड्कर

गडचांदुर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील पालडोह या छोट्याशा गावात डिजिटल जिल्हा परिषद शाळा पाहायला मिळणार आहेत,महत्वाचे म्हणजे ही जिल्हा परिषद शाळा वर्षाला ३६५दिवस सुरू असते कोणत्याही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा शिकवणी वर्ग सुरू असते,
त्या शाळेचा संघर्ष पाहता खूप अभिमान वाटतो तिथे मुख्याध्यापक पदी रुजू असलेले श्री.राजेंद्र परीतेकी यांचा या गावासाठी व शाळेसाठी खूप लाख मोलाचा वाटा आहे परीतेकी सर २००६ मध्ये पालडोह या प्राथमिक शाळेवर रुजू झाले आणि तिथूनच या शाळेच्या क्रांतीची सुरुवात झाली ,यवतमाळ जिल्ह्यातील कान्ही या गावचे रहिवासी असलेले श्री परितेकी
रुजू झाले तेव्हापासून आजपावेतो याच शाळेवर आहे आज जवळपास १५ वर्षे होऊन सुद्धा सरांनी कधींही बदलीचा विषय डोक्यात आणला नाही या पंधरा वर्षाच्या काळात सरांनी शाळेचं संपूर्ण रंगरूप बदलवून टाकलं *आज सरांच्या अथक प्रयत्नांनी ९ वी व १० विचे वर्ग मंजूर झाले आहेत* परातेकी सरांच्या प्रयत्नाने ही शाळा डिजिटल शाळा म्हणून प्रसिद्धीस आली *आज हि शाळा महाराष्ट्रात 17व्या क्रमांकावर* आणि *आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे*.. याचा खूप अभिमान वाटतो परीतेकी सरांच्या अथक परिश्रमामुळे हे सगळं सिध्द झाल आहे जिवती पहाडावर जिथं शिक्षक जाण्यासाठी टाळाटाळ करतात, बदली करून घेतात,पण एक परेतिकी सर एक आदर्श शिक्षक म्हणूण सन्मानित आहे सरांची पंधरा वर्षे तर पाहता पाहता निघून गेली पण या पुढे सुद्धा इथेच या शाळेसाठी खर्ची करणार आहेत
विशेष म्हणजे येथील विद्यार्थी सुद्धा विद्यार्थ्यांना परिपाठ पूर्ण पणे शिकवतात हे सर्व बघून प्रहार चे कार्यकरते भारावून गेले ,येथील जिल्हा परिषद शाळेला ,एडमिशन फुल असा बोर्ड दर वर्षी पाहायला मिळतो व काही विद्यार्थ वेटींग वर राहतात
प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे क्रांती सप्ताह दीन राबवण्यात आला त्यात आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याच्या निमित्ताने खरच एक आदर्श शिक्षक पाहायला मिळाले ,याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना देण्यात आली असून चंद्रपूर दौरा दरम्यान शाळेला नक्की भेट देऊ असे आश्वासन देण्यात आले आहे
पालडोह शाळेला परितेकी सर मिळाले खूप अभिमानाची गोष्ट आहे ते विद्यार्थ्यासाठि देवदूत भेटल्यासारख झालं सरांनी शाळेचं वातावरण खूप छान केलं विशेष म्हणजे हि शाळा ३६५ डे सुरु असते अशी नव्याने ओळख निर्माण करत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष सतीश बिडकर, पंकज माणूसमारे, तिलक पाटील, जीवन तोगरे, अनुप राखुंडे,यांनी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापक परतेकि सरांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here