महात्मा गांधी विद्यालयात अमृत महोत्सवी स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा

लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,विविध कार्यक्रमाचे आयोजन,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय,विज्ञान महाविद्यालय,स्कॉलर अकॅडमी, विद्या मंदिर गडचांदूर च्या वतीने 75वा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,
मुख्य ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ऍड,विठ्ठलराव धोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,तर
आर,एस, पी,व स्काउट गाईड चे ध्वजारोहण मुख्याध्यापीका तथा प्राचार्या स्मिताताई चिताडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक रामचंद्र सोनपितरे ,श्रीमती उज्वलाताई धोटे,विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य रामकृष्ण पटले, स्कॉलर अकॅडमी च्या प्राचार्या रश्मी भालेराव, उपमुख्याध्यापीका शोभा घोडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे,होते,
कोविड 19 मुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांना शालेय गणवेश वाटप अतिथीच्या हस्ते करण्यात आले , अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,त्याचा निकाल यावेळी जाहीर करण्यात आला,
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत धाबेकर व प्रा, आशिष देरकर यांनी केले तर आभारप्रदर्शन तुकाराम धुर्वे यांनी केले, याप्रसंगी शिक्षक, प्राध्यापक, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here