

By : Shivaji Selokar
भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी प्रतिमेचे पूजन करून तसेच पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केले व त्यांना नमन केले यावेळी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष मनुन आपली छाप पाडली व जनसंघाला शिखरावर नेण्याचे योगदान दिले, नेहमी आपल्या वाणीतून मनत एक देश मे दो प्रधान,दो विधान, और दो निशाण नही चलेगे असे म्हणणारे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी याना नमन करून पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख,सुरेश रागीट,भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य संजय उपगनलावार,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजपा नेते महादेव तपासे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,जनार्दन निकोडे,संदीप मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.