योगाला जागतिक स्तरावर पोहोचवून भारताने विश्वगुरूचा सन्मान प्रस्थापित केला – हंसराज अहीर


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*चंद्रपूरात विविध ठिकाणी योगदिनाचे कार्यक्रम साजरे*

चंद्रपूर:- आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्याने भारतीय जनत पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने दि. 21 जून 2021 रोजी सकाळी 6.30 वा. जोडदेऊळ वार्ड, संजय नगर, जगन्नाथ बाबा मठ माना टेकडी व अन्य परिसरामधे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडले.
या कार्यक्रम प्रसंगी हंसराज अहीर यांनी आपल्या अमुल्य मार्गदर्शनात सांगीतले की, विविध प्राचिन संस्कृती व उदात्त परंपरेच्या भारत देशाने योगविद्येचे संवंर्धन व संरक्षण करून समाज कल्याणार्थ ही विद्या वापरली व त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात देशाच्या ऋषीमुनी व योगसाधक महान व्यक्तीमत्वांनी मोलाचे कार्य केले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी या योगाला सातासमुद्रापलीकडे पोहोचवित त्याचे महत्व जागतिक व्यासपीठांवर प्रतिपादीत केल्याने आज 175 हुन अधिक देश जागतिक स्तरावर हा योग दिन साजरा करण्यास सिध्द झाले आहेत. त्यामुळे भारताने विश्वगुरूचा सन्मान प्राप्त केला.
देशावर कोरोनासारख्या अरीष्ठाने संकट कोसळल्यानंतर अनेकांनी योगाच्या माध्यमातून आपले स्वास्थ्य व मनोबल वाढवुन कोरोना रोगावर मात केली. हे वास्तव लक्षात घेवून प्रत्येकांनी योग दिनाचे पाश्र्वभुमिवर आपल्या दैनदीन जिवनाचा भाग म्हणुन योगाला अंगीकारावे व आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अबाधित राखावे असे आवाहन या कार्यक्रम प्रसंगी केले. या कार्यक्रमात प्रामुख्याने माजी महापौर अंजलीताई घोटेकर, नगरसेविका संगीता खांडेकर, राजु घरोटे, विनोद शेरकी, रमेश भुते, वासुदेव भुते, मिलींद गंपावार, सुर्यकांत कुचनवार, राजेंद्र खांडेकर, शैलेश इंगोले, गणेश रानगुंडावार, राजु जोशी, श्रावन बोन्सुले, राजु भुषनवार, स्मिता रेभनकर, ज्योतीताई मेश्राम, वंदना भुषनवार, दोशल चिडे, प्रतिक्षा धकाते, रोषनी धकाते, केसर हांडे, भाऊराव उताने, चंदा शेरकी, विजया मलोडे, रोहिनी सातपुते, शितल शेरकी यांचे सह पतंजली योग समिती, गुरूदेव सेवा मंडळ व अन्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या योगदिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षीत तज्ञांच्या मार्गदर्शनात योग विद्योचे धडे घेतले.
*संजयनगर व माना टेकडी येथे योगदिन कार्यक्रम*
संजय नगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहाच्या पटांगणात योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित महिला पुरूषांनी योग करून हा दिवस साजरा केला. या कार्यक्रमास दिनकर सोमलकर, नगरसेविका वंदना जांभुळकर, चंद्रकला सोयाम, शाशिकांत मस्के, धनराज कोवे, किसन झाडे, सुरेश घोडके, ममता टापरे, विद्या धोटे, रूपाली लोखंडे, रामभाऊ ढगे, विजय आत्राम, शंकर घुसे, मनोज सिंघवी, रामजी हरणे. माना टेकडी स्थित जगन्नाथ बाबा मठात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात नसरीन शेख, अपर्णा चिडेवार, वंदना संतोषवार, अश्विन मुसहे, देवानंद साखरकर, जतीन पटेल, नरेंद्र लभाने, समीर लाभे, सविता मराम, समोबर शेख यांचेसह अनेकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *