ठाणेदाराला लाच देणारे अडकले !! * अकोल्यात तिघांवर दुर्मिळ कारवाई

0
336

By : Shankar Tadas
अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला लाच दिल्याप्रकरणी तीन आरोपी अडकल्याची दुर्मिळ घटना नुकतीच घडली आहे.
या कारवाईत शिवा गोपाळराव मगर (30) रा. अकोट, अभिजित रविकांत पागुत (31) रा. अकोट आणि घनश्याम गजानन कडू रा. लोतखेड ता. अकोट अशी आरोपीची नावे आहेत. आरोपीने दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत दारू, वरली मटका आदी अवैध धंदे चालविण्यासाठी 50 हजार रुपये लाच देण्याचे आमिष दाखविले. त्यात तडजोड करून 21 मे रोजी पहिला हप्ता म्हणून 25 हजार देताना अकोला ACB चे पोलीस उप अधीक्षक शरद मेमाणे आणि पथकाने रंगेहात अटक केली.
गैरअर्जदार शिवा गोपाळराव मगर याने इतर दोन गैरअर्जदार यांच्यासाठी तक्रारदार लोकसेवक ठाणेदार यांच्या पो.स्टे. हद्दीत दारू, वरली मटका असे अवैध धंदे सुरू करण्यासाठी 50 हजार रुपयाचे प्रलोभन दिले होते. तडजोडीअंती 25 हजार रुपये दिली. यावेळी तीनही आरोपीना रंगेहाथ पकडन्यात आले.
ही कारवाई अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल वि. गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या
मार्गदर्शनाखाली अकोला ACB चे पोलीस उप अधीक्षक शरद मेमाणे, हवालदार अन्वर खान, संतोष दहीहाडे, सुनील येलोने यांनी केली.
*******-
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग वाशीम यांनी नागरिकाना आवाहन केले आहे की,
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा :
दूरध्वनी क्र. 0724 2420370
@टोल फ्रि क्रं 1064 मोबाईल नंबर – 9923416630

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here