सलग चौथ्या दिवशीही राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने एक घास मदतीचा उपक्रम.

0
271

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– प्रदेश महिला काँग्रेसच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान वितरित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व आणि मार्गदर्नाखाली राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एक घास मदतीचा अंतर्गत मोफत अन्नदान वितरित करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक गजानन भटारकर, नगरसेविका तथा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या चांदेकर, कार्याध्यक्षा संगीता मोहुर्ले, जवाहर नगर काँग्रेस सचिव पुष्पवर्षा जुलमे, शुभांगी खामनकर, योगिता मटाले, यासह महिला काँग्रेसच्या सदस्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here